शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

राष्ट्ररक्षेसारखं व्रत नाही... राफेल भारतभूमीवर उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवली राष्ट्रभक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 5:18 PM

Rafale in India: भारताचं सामरिक सामर्थ्य राफेलच्या आगमनानं प्रचंड वाढलंय आणि स्वाभाविकच देशवासीयांचं मनोधैर्य उंचावलंय.

नवी दिल्लीः आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे ‘ब्रह्मास्र’ मानली जाणारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर जेट आज भारतभूमीवर सुखरूप उतरली. फ्रान्सहून तब्बल सात हजार किलोमीटरचं अंतर कापून आलेल्या या पाच विमानांचं देशभरातून मनःपूर्वक स्वागत होतंय. भारताचं सामरिक सामर्थ्य राफेलच्या आगमनानं प्रचंड वाढलंय आणि स्वाभाविकच देशवासीयांचं मनोधैर्य उंचावलंय. देशाचा ऊर अभिमानानं भरून आलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संस्कृतमधील एका राष्ट्रभक्तिपर सुभाषितातून राफेलचं स्वागत केलं आहे.

राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो,दृष्टो नैव च नैव च।।

नभः स्पृशं दीप्तम्... स्वागतम्!

असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. राष्ट्ररक्षणासारखं पुण्य नाही, राष्ट्ररक्षणासारखं व्रत नाही आणि राष्ट्ररक्षणासारखा यज्ञ नाही, असा या संस्कृत श्लोकाचा आशय आहे.

एका बाजूला कुरापतखोर पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला धूर्त चीन, असा शेजार असल्यानं भारताला अक्षरशः डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचं रक्षण करावं लागतंय. अशातच, गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर ड्रॅगनचे मनसुबे उघड झाले आहेत. भारतीय जवानांनी दाखवलेला हिसका आणि केंद्राच्या मुत्सद्देगिरीनंतर चीननं सैन्य मागे घेण्याची तयारी दाखवलीय. पण त्यांचा काही भरवसा नाही. या पार्श्वभूमीवर, राफेल विमानं लवकर पाठवण्याची  विनंती फ्रान्सला केली होती. ती मान्य करून, फ्रान्सनं पाच विमानांची तुकडी काल रवाना केली होती. ही विमानं आज दुपारी साडेतीन वाजता ती हरयाणातील अंबाला एअरबेसवर लँड झाली. ते दृश्य भारतीयांचा आत्मविश्वास उंचावणारंच होतं.

तत्पूर्वी, राफेल विमानांनी भारताच्या आकाशात प्रवेश केला, तेव्हा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडीओ ट्विट करून या विमानांचं स्वागत केलं होतं. पाच राफेल विमानांना दोन सुखोई विमानांनी एक्सॉर्ट केल्याचा तो क्षणही नेत्रदीपक होता.

अंबाला हवाई तळाचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. अंबालापासून चीन आणि पाकिस्तान अतिशय जवळ आहेत. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये अंबालातून आकाशात झेपावून राफेल विमानं शत्रूवर तुटून पडू शकतात.

राफेलसंबंधीच्या अन्य बातम्याः

राफेलचं आगमन होताच नेटीझन्स भावूक, मनोहर पर्रीकरांची झाली आठवण

'नरेंद्र मोदींमुळेच 'राफेल भारतात', पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाबद्दल आभार'

'राफेल गेमचेंजर ठरणार नाही, चीनचीही चिंता वाढेल असं वाटत नाही'; शरद पवारांचा दावा

'आता तरी किंमत सांगा...', राफेलवरून दिग्विजय सिंहांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'राफेल'चे लँडिंग होताच शेजारील राष्ट्रांत भूकंप; भारतीय क्रिकेटपटूचं ट्विट व्हायरल

राफेल विमानाच्या टेलवर लिहिलेल्या RB आणि BS चा काय आहे अर्थ?

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाRajnath Singhराजनाथ सिंहindian air forceभारतीय हवाई दल