Rafale Deal: 'बालवाडीतील मुलालाही जे कळेल, ते राहुल गांधींना कळत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 15:12 IST2019-01-02T15:00:20+5:302019-01-02T15:12:13+5:30

संसद सभागृहात राफेल करारावरु चांगलाच गदारोळ माजला आहे. राहुल गांधींच्या आक्रमक भाषणानंतर, त्याच त्वेषाने अर्थमंत्री अरुण जेटलींनी राहुल गांधींवर जोरदार प्रहार केला.

Rafale Deal: 'Rahul Gandhi does not understand what kind of child in kindergarten' | Rafale Deal: 'बालवाडीतील मुलालाही जे कळेल, ते राहुल गांधींना कळत नाही'

Rafale Deal: 'बालवाडीतील मुलालाही जे कळेल, ते राहुल गांधींना कळत नाही'

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने खोटं बोलत आहेत. राहुल यांचं प्रत्येक वाक्य कोर्टाचा अवमान करणार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. संसदेत राहुल गांधींनी राफेल संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जेटलींना राहुल यांना फटकारलं. तसेच, राफेलची किंमत बालवाडीतील मुलालाही कळेल, पण राहुल गांधींना ते कळेना, अशा शब्दात राहुल यांच्यावर जेटलींनी टीका केली. 


संसद सभागृहात राफेल करारावरु चांगलाच गदारोळ माजला आहे. राहुल गांधींच्या आक्रमक भाषणानंतर, त्याच त्वेषाने अर्थमंत्री अरुण जेटलींनी राहुल गांधींवर जोरदार प्रहार केला. जो पक्ष अनेक दिग्गजांनी चालवला, त्या पक्षाच्या आजच्या अध्यक्षांना कॉम्बॅट एअरक्राफ्ट काय असतं हे माहिती नाही. देशात काही लोक आणि कुटुंब असे आहेत, ज्यांना पैशाचं गणित समजत पण देशाच्या सुरक्षेबद्दल त्यांना घेणं देणं नाही, हे देशाचं दुर्दैव, असा टोलाही अरुण जेटली यांनी लगावला. राफेल विमानाची किंमत बालवाडीतील मुलालाही कळेल, पण राहुल गांधींना ते कळेना असे म्हणत अरुण जेटलींनी राहुल गांधींवर जोरदार प्रतिहल्ला केला. दरम्यान, बोफर्स, नॅशनल हेरॉल्ड आणि अगुस्ता वेस्टलँड घोटाळ्यात ज्यांच्याकडे बोट दाखवलं गेलं ते आज राफेलवर संशय घेतात, असेही जेटलींनी म्हटले. 



 

Web Title: Rafale Deal: 'Rahul Gandhi does not understand what kind of child in kindergarten'