शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींकडून भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 13:54 IST

राफेल डीलवरुन राहुल गांधींची मोदींवर जोरदार टीका

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि आणि रिलायन्सच्या अनिल अंबानी यांच्यात नेमकं काय डील झालं, हे देशाला कळायला हवं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. मोदींनी भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी मोदींवर बरसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी मिळून भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटी रुपयांचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. 'मोदीजी तुम्ही देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या रक्ताचा अपमान केला आहे. तुम्हाला लाज वाटायला हवी,' अशा तिखट शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल व्यवहाराच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमा, अशी मागणीदेखील त्यांनी केली. राफेल डीलसाठी मोदी सरकारनं फक्त अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचं नाव सुचवलं होतं. त्यामुळेच फ्रान्सच्या डॅसो एव्हिएशेन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर राहुल गांधींनी मोदींवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. मोदींनी वैयक्तिक रस घेऊन राफेल डीलमध्ये बदल केले, असा आरोप राहुल गांधींनी ओलांद यांच्या विधानानंतर केला. राहुल गांधींनी ओलांद यांचे आभार मानत मोदींवर निशाणा साधला. 'दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानींसाठी मोदींनी कोट्यवधी रुपयांचा करार केला. त्यांनी देशाचा विश्वासघात केला. त्यांनी आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांचा अपमान केला,' अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा