शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: 'राहुल गांधींनी मोदींविरोधात पाकिस्तानसोबत महाआघाडी केलीय का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 12:55 IST

भाजपा अध्यक्ष अमित शहांचा राहुल गांधींना सवाल

नवी दिल्ली: राफेल डीलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भाजपा अध्यक्ष अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनं मोदींविरोधात पाकिस्तानसोबत महाआघाडी केली आहे का?, असा प्रश्न अमित शहांनी उपस्थित केला आहे. राफेल विमान खरेदीवरुन फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राहुल यांनी मोदींवर कठोर शब्दांमध्ये टीका केली होती. राफेल डीलसाठी मोदी सरकारनं केवळ अनिल अंबानी यांच्या कंपनीचं नाव सुचवलं होतं, असा दावा फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केला. यावरुन राहुल यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. राहुल यांचं मोदींवर टीका करणारं ट्विट पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसेन यांनी रिट्विट केलं. याचा संदर्भ देत अमित शहांनी राहुल गांधींवर तोंडसुख घेतलं. 'राहुल गांधी म्हणतात मोदी हटाव. पाकिस्तानही म्हणतं मोदी हटाव. आता पाकिस्ताननंदेखील राहुल गांधींच्या सूरात सूर मिसळायला सुरुवात केली आहे. काँग्रेसनं मोदींविरोधात आंतरराष्ट्रीय महाआघाडी केली आहे का?', असा सवाल अमित शहांनी विचारला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डीलवरुन मोदींना अनेकदा लक्ष्य केलं आहे. आता फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. मोदी सरकारकडून राफेल करारासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्सचं नाव सुचवण्यात आलं होतं. मोदी सरकारनं केवळ एकच नाव सुचवल्यानं फ्रान्सच्या डॅसो एव्हिऐशन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सवा ओलांद यांनी केलं होतं. यावरुन राहुल गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली होती. फ्रान्सचे माजी अध्यक्ष मोदींना चोर म्हणाले. आता तरी मोदींनी मौन सोडावं, अशा तिखट शब्दांमध्ये राहुल यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी आणि अनिल अंबानींनी भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा घणाघातही राहुल यांनी केला होता. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलAmit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस