शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

Rafale in india : भारतीय आकाशात राफेलचं आगमन, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला 'अफलातून व्हिडिओ'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 2:36 PM

भारतात अंबाला विमानतळावर काही वेळातच राफेल विमानं दाखल होणार आहेत. या राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

नवी दिल्ली - चीनच्या सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय दलाने केलेली खास विनंती मान्य करून फ्रान्सने राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत 5 विमानांची पाठवणी केली आहे. बहुप्रतिक्षीत असलेल्या या राफेल विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राफेल विमानांच्या गगनभरारीचा अफलातून व्हिडिओ शेअर केला आहे. 

भारतात अंबाला विमानतळावर काही वेळातच राफेल विमानं दाखल होणार आहेत. फ्रान्सकडून पहिल्या टप्प्यात 5 राफेल विमानं भारताला देण्यात आली असून या 5 राफेलसह 2 SU30 MKIs विमान आहेत. त्यामुळे, एकूण 7 लढाऊ विमानांच काही वेळातचं विमानतळावर आगमन होईल. मात्र, हा व्हिडिओ पाहून शेअर करण्याचा मोह आवरणार नाही.  राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेष म्हणजे भारतात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. अंबाला एअरफोर्स स्टेशनवर भारतीय हवाई दलाची ही नवीन राफेल लढाऊ विमानं तैनात केली जाणार आहेत. राफेलसारख्या प्राणघातक आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांना तैनात करण्यासाठी केवळ अंबालाच का निवडले गेले. कारण अंबाला अशी जागा आहे जिथून आपल्या देशातील दोन्ही शत्रूंना काही मिनिटांत धुळीस मिळवता येऊ शकते.

राजनाथसिंह यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी २ जून रोजी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री प्लॉरेन्स पार्ले यांच्याशी टेलिफोनवरून चर्चा केली तेव्हा कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ सुरु असले तरी भारताला राफेल विमानांची पहिली खेप ठरल्या तारखेला सुपूर्द करण्याची हमी फ्रान्सकडून देण्यात आली. करारानुसार भारत ५९ हजार रुपये कर्च करून एकूण ३६ राफेल विमाने खरेदी करण्यात येत आहेत. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज अशा राफेल लढाऊ विमानांनी हवाईदलाच्या मारकक्षमतेस मोठे बळ तर मिळेलच. शिवाय सीमेवर डोळे वटारणाऱ्या चीनलाही त्यामुळे जरब बसेल, असे जाणकारांना वाटते. ३६ पैकी ३० विमाने प्रत्यक्ष युद्दसज्जतेसाठी व चार प्रशिक्षणासाठी वापरली जातील. या विमानांची एक स्वाड्रन अंबाला येथे तर दुसरी प. बंगालमध्ये हाशिमारा येथे तैनात केली जाईल.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRajnath Singhराजनाथ सिंहAir Indiaएअर इंडियाairforceहवाईदल