शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Rafale Deal: विमान खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:08 PM

Rafale Deal : राफेल विमान करारावरून केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

नवी दिल्ली - राफेल डील वरून केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. राफेल कराराप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना या विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र सरकारला दिले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑक्टोबरला होणार आहे. 

राफेल विमानांच्या किमतींवरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना केंद्र सरकारला कोणतीही नोटीस न बजावता माहिती मागितली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान कराराच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सीलबंद लिफाफ्यातून आपल्यासमोर सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. "सुरक्षा दलांसाठी राफेल विमानांच्या असलेल्या उपयुक्ततेबाबत आम्ही कोणतेही मत प्रदर्शित केलेले नाही. तसेच आम्ही सरकारला कोणतीही नोटीस बजावेली नाही. पण हा करार करताना अवलंबण्यात आलेल्या प्रक्रियेच्या वैधतेबाबत समाधानकारक माहिती आम्ही मिळवू इच्छितो," असे  सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले.  दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीताराम या राफेल विमान खरेदीवरून देशात उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्या आपले फ्रान्स सरकारमधील समकक्ष फ्लोरेंस पार्ली यांच्याशी दोन्ही देशांमधील सामरिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत तसेच स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा  होऊ शकते. दरम्यान, राफेल विमान करारात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. यूपीए सरकारने केवळ ५२६ कोटी रुपये एवढे एका विमानाचे मूल्य ठरवले असताना, मोदी सरकारने नवा करार करून १६७० कोटी रुपयांना विमानांची खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार