"तेरी क्या चीज है, तू..."; बिहार विधान परिषदेत राबडी देवी यांच्या संदर्भात हे काय बोलून गेले नीतीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:56 IST2025-03-25T14:54:57+5:302025-03-25T14:56:07+5:30
नीतीश पुढे म्हणाले, हे सर्व काय सुरू आहे, याला काय अर्थ आहे? हे कशासाठी परिधान करून आला आहात. हे सर्व निरुपयोगी आहे....

"तेरी क्या चीज है, तू..."; बिहार विधान परिषदेत राबडी देवी यांच्या संदर्भात हे काय बोलून गेले नीतीश कुमार
बिहार विधान परिषदेत आज नीतीश कुमार आणि राबडी देवी यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक बघायला मिळाली. झाले असे की, आजच्या कामकाजावेळी विरोधी पक्षांचे आमदार आरक्षणाचा मुद्दा असलेले टी-शर्ट परिधान करून विधान परिषदेत पोहोचले. या आमदारांनी 65 टक्के आरक्षण 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचा मुद्दा उपस्थित करत गदारोळ केला. याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री राबडी देवी करत होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री नीतीश कुमार उभे राहिले आणि विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उभे राहिले. यावेळी, नीतीश कुमार आणि राबडी देवी समोरासमोर आले.
राबडी देवी यांना उद्देशून नीतीश कुमार म्हणाले, "अरे बसा ना तुम्ही, जे आहे तुमच्या पतीचे आहे, तुमची काय लायकी आहे (तेरी क्या चीज है), बसा तुम्ही. जे काही आहे, तुमच्या नवऱ्याचे आहे. सर्वांना सांगितले, हेच परिधान करून चला. या बिचारीला काही येत नाही. जेव्हा पती रिजेक्ट झाले, तेव्हा यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. या तर अशाच आहेत."
नीतीश पुढे म्हणाले, हे सर्व काय सुरू आहे, याला काय अर्थ आहे? हे कशासाठी परिधान करून आला आहात. हे सर्व निरुपयोगी आहे.
ईदचं औचित्य साधत भाजपा ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला देणार भेट; काय आहे 'सौगात ए मोदी'?
नीतीश कुणार आणि राबडी देवी यांच्यात चकमक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही असे घडले आहे. काही दिवसांपूर्वी बिहार विधान परिषदेतच मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यात चकमक झाली होती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर नीतीश कुमार भडकले होते. राबडी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते, असा टोला त्यांनी राबडी देवी यांना लगावला होता.