शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव व चंद्राबाबू नायडूंनाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 4:10 AM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, लोकसभेतील कॉग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही निमंत्रण दिले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १७ ते १९ सप्टेंबर या काळात दिल्लीच्या विज्ञान भवनात होणाऱ्या ‘भविष्यातील भारत-संघाचा दृष्टीकोन’ या विषयावरील शिबिरासाठी आता बसपाच्या प्रमुख मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, लोकसभेतील कॉग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही निमंत्रण दिले आहे.कार्यक्रमासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांना निमंत्रण दिल्याची माहिती संघाचे प्रचारप्रमुख अरुणकुमार यांनी दिली होती. मात्र निमंत्रण मिळाले नसून, ते मिळाल्यानंतर पक्ष भूमिका जाहीर करेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. संघाच्या व्यासपीठावर राहुल यांनी जाऊ नये, असे अनेक नेत्यांनी नमूद केले होेते. त्यामुळे राहुल गांधी काय करणार, ही उत्सुकता कायम आहे.पण आता जवळपास सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे प्रमुख, मुख्यमंत्री व विविध क्षेत्रांतील मान्यवर अशा सुमारे तीन हजार लोकांना संघाने कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. याखेरीज विविध धार्मिक गुरू व नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनाही संघाने या कार्यक्रमासाठी बोलावले आहे.ममता बॅनर्जी, खरगे, मायावती, चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव हे सारे नेते संघाच्या कार्यक्रमाला जाणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात ते जाण्याची शक्यता कमी असल्याचा संघाचाही अंदाज आहे. पण आम्ही राजकीय अस्पृश्यता पाळत नाही आणि केवळ भाजपाच्या नेत्यांनाच बोलावत नाही, हे दाखवण्यासाठी संघाने या साºयांना निमंत्रित केल्याचे समजते. यापैकी एकाही नेत्याचा कधीही संघाशी अप्रत्यक्षही संबंध आलेला नाही. तसेच हे सारे संघाचे कडवे टीकाकार आहेत.>आम्ही तिथे का जावे?अधिकाधिक लोकांना संघाचे विचार व कार्यप्रणाली याविषयी माहिती देण्यासाठी बोलावले आहे. अर्थात, कोणाला बोलावले, हे आम्ही जाहीर करणार नाही, असे संघाच्या एका पदाधिकाºयाने सांगितले. तिथे केवळ हिंदुत्वाविषयीच बोलले जाणार असेल आणि स्वत:ची पाठ थोपटून घेतली जाणार असेल, तर आम्ही तिथे का जावे, असा सवाल एका काँग्रेस नेत्याने केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ