रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:59 IST2025-12-05T15:58:29+5:302025-12-05T15:59:32+5:30
Putin India Visit: व्लादिमीर पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्धावर महत्वाची टिप्पणी केली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज(दि.5) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यादरम्यान, पुतिन यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्टपणे भाष्य केले. रशिया आता अमेरिकेसह अनेक देशांसोबत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांततामय पर्यायांवर विचार करत असल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली.
#WATCH | In his meeting with PM Narendra Modi, Russian President Vladimir Putin says, "First of all, thank you very much for inviting me...I could share a great deal of details about the events taking place in Ukraine. We are taking together with some partners, including the US,… pic.twitter.com/lVCmpIhELv
— ANI (@ANI) December 5, 2025
भारताच्या भूमिकेचे पुतिन यांच्याकडून कौतुक
बैठकीदरम्यान पुतिन म्हणाले की, युक्रेन प्रकरणावर भारताने नेहमीच गंभीर, संतुलित आणि जबाबदार भूमिका घेतली आहे. आम्ही भारताच्या या भूमिकेला खऱ्या अर्थाने महत्व देतो आणि याला शांती प्रक्रियेतील सकारात्मक योगदान मानतो.
द्विपक्षीय संबंधांवर टिप्पणी
पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांबाबत म्हणाले की, हे नाते फक्त ऐतिहासिक नाही तर, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे गेल्या काही वर्षांत अधिक मजबूत आणि आधुनिक झाले आहे. आता दोन्ही देशांनी उच्च-तंत्रज्ञान, अवकाश क्षेत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या पिढीच्या तंत्रज्ञानांमध्ये सहकार्य वाढवले आहे. ही भागीदारी केवळ कूटनीती नाही, तर खऱ्या प्रगतीचे प्रतीक आहे.
#WATCH | In his meeting with Russian President Vladimir Putin, PM Narendra Modi says, "...The welfare of the world is only through the path of peace. Together, we must look for the pathways to peace. With the efforts that have been ongoing for the past few days, I am confident… pic.twitter.com/iVc1OUBtX6
— ANI (@ANI) December 5, 2025
रशिया-युक्रेन युद्धावर पीएम मोदींची प्रतिक्रिया
युक्रेन संकटानंतर आमचा सतत संवाद सुरू आहे. एक खरा मित्र म्हणून, तुम्ही आम्हाला वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली. माझा असा विश्वास आहे की, विश्वास ही एक महान शक्ती आहे. जगाचे कल्याण केवळ शांततेच्या मार्गानेच होते. एकत्रितपणे, आपण शांततेचे मार्ग शोधले पाहिजेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे, मला विश्वास आहे की पुन्हा एकदा जग शांततेकडे परत येईल, अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी व्यक्त केली.
युद्ध समाप्तीसाठी नवा मार्ग?
या बैठकीतील सर्वाधिक महत्त्वाचे विधान म्हणजे, रशिया आता अमेरिका सोबतही संवाद करत आहे, हे पुतिन यांनी उघडपणे मान्य केले. या भेटीतून मिळालेल्या संकेतांनुसार, युक्रेनबाबत मोठ्या देशांमध्ये संवाद साधला जात असून, रशियाची भूमिका आता अधिक लवचिक होत असल्याचे दिसत आहे. तज्ञांच्या मते, पुतिन यांची टिप्पणी भावी शांती चर्चेचा पहिला मोठा टप्पा ठरू शकते.