शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये टीव्ही लावून द्या, यूरो कप बघायचाय; 'बाहुबली' आमदाराची अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 16:06 IST

'Bahubali' MLA Mukhtar Ansari news: स्वतः खेळाडू असल्याचे सांगत मुख्तार अन्सारीने टीव्हीची मागणी केली आहे

ठळक मुद्देमला टीव्ही पाहण्याची परवानगी द्यायूरो कप पाहण्यासाठी तुरुंगात टीव्ही देण्याची मागणी

बाराबंकी: उत्तर प्रदेशातील बांदाच्या तुरुंगात कैद असलेल्या बाहुबली बसपा आमदार मुख्तार अन्सारीने सुनावणीदरम्यान परत एकदा तुरुंगात टीव्ही पाहू देण्याची मागणी केली आहे. बनावट अॅम्ब्युलन्सप्रकरणात सोमवारी झालेल्या व्हर्चुअल सुनावणीदरम्यान मुख्तार अंसारीने स्वतः खेळाडू असल्याचे सांगत न्यायाधीशांकडे यूरोपमध्ये सुरू असलेला यूरो-2020 फुटबॉल चषक (UEFA EURO 2020) पाहण्यासाठी टीव्ही देण्याची मागणी केली. (Strange demand of 'Bahubali' MLA) 

बनावट अॅम्ब्युलन्सप्रकरणी मुख्तार अन्सारीचे वकील रणधीर सुमनने सांगितल्यानुसार, अन्सारीने न्यायालयात म्हटले की, संपूर्ण राज्यात कैद्यांना टीव्ही पाहू दिला जातो. पण, मला टीव्हीपासून दूर ठेवले जात आहे. मी खेळाडू आहे, मला सध्या सुरू असलेला यूरो 2020 फुटबॉल कप (UEFA EURO 2020) पाहायचा आहे. मला टीव्ही पाहण्याची परवानगी द्यावी, असे त्याने म्हटले. तसेच, मी 16 वर्षांपासून तुरुंगात कैद असून, फक्त राज्यकीय द्वेषापोटी या प्रकरणात अडकवले जात असल्याचे तो म्हणाला.

अॅम्ब्युलन्स प्रकरणात आरोपपत्र दाखलआमदार मुख्तार अंसारीच्या बनावट पत्त्याच्या आयडीवरील रजिस्ट्रेशनप्रकरणी पोलिसांनी सोमवारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. त्यात मुख्तार अन्सारीसह तुरुंगातील इतर 7 जणांवर आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, आरोपपत्र दाखल करण्यात उशीर झाल्याने खटल्यात मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणातील तुरुंगात पाठवलेला पहिला आरोपी राजनाथ यादवचा तुरुंगवास 90 दिवसांच्या पुढे जात होता. 

तात्काळ आरोपपत्र दाखल झाले नसते, तर न्यायालयाला नाईलाजाने यादवला सोडावे लागले असते. पण, पोलिसांकडून वकील महेंद्र प्रताप सिंह सोमवारी कोर्टात दाखल झाले आणि मुख्तार अन्सारीच्या बनावट अॅम्ब्युलन्स प्रकरणात मऊतील शाम संजीवनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.अल्का राय, सीएचसीचे सरकारी डॉक्टर शेषनाथ राय, मुख्तार अंसारीचे प्रतिनिधि मुजाहिद, मुजाहिदचे साथीदार राजनाथ यादव, आनंद यादव, अँब्यूलंस चालक सलीमविरोधात पहिले आरोपपत्र दाखल केले. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील इतर आरोपींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात आरोपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीFootballफुटबॉलBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश