शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की: राहुल गांधींविरोधातील तक्रारीचा तपास क्राइम ब्रँचकडे वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 00:12 IST

Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात संसदेतील प्रवेशद्वारावर झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी दाखल एफआयआरचा तपास आता क्राईम ब्रँचकडून करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात संसदेतील प्रवेशद्वारावर झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी दाखल एफआयआरचा तपास आता क्राईम ब्रँचकडून करण्यात येणार आहे. संसदेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजपाच्या काही खासदारांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.  

संसदेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात भादंवि कलम ११५ (जाणीवपूर्वक दुखापत करणं), १२५ (इतरांचं जीवित किंवा सुरक्षेला धोका उत्पन्न करणारे कृत्य करणे), १३१, ३५१ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडून करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

भाजपाच्या नेत्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर काही तासांतच राहुल गांधी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपा नेत्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये राहुल गांधींवर धक्काबुक्कीदरम्यान हल्ला करण्यासाठी चिथावणी देण्याचा आरोप राहुल गांधींवर करण्यात आला होता. संसदेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या धक्काबुक्कीमध्ये भाजपाचे प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत हे जखमी झाले होते. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांकडून राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. तसेच सा प्रकरणात इतर खासदारांचे जाबबही नोंदवले जाऊ शकतात.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी