उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर वाहतुकीवर आणि वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून वाहनांतून प्रवास करणाऱ्या जोडप्यांचे खाजगी क्षण चित्रीत करून त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षा आखणी खाजगीपणाबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. महामार्गावर तैनात असलेले कर्मचारीच या कॅमेऱ्यांचा दुरुपयोग करत असल्याचे आणि त्यामाध्यमातून प्रवाशांच्या खाजगी जीवनात डोकावत असल्याचे समोर आले आहे. असाच एक खाजगी व्हिडीओ चित्रित करून या कर्मचाऱ्यांनी एका जोडप्याला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसवेच्या आसपास शेतजमिनी असलेले ग्रामस्थ चिंतीत झाले असून, ‘शेतात जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कारमध्ये रोमान्स करत असलेल्या जोडप्याचा व्हिडीओ चित्रित करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा प्रकार हलियापूर टोलनाक्याजवळ घडला होता. त्यामुळे आता हलियापूर टोलनाक्याच्या आसपार राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ग्रामस्थांच्या मते हे कॅमेरे सुरक्षेसाठी लावण्यात आले होते. मात्र आता ते आमच्यासाठी धोकादायक बनले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलांचंही चित्रिकरण होऊ शकतं. हे कॅमेरे अतिशय शक्तिशाली असून, गेल्या दीड वर्षांत किती व्हिडीओ चित्रित करून व्हायरल केले गेले असतील, हे सांगता येत नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कंपनीने या व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केलं आहे. तसेच कंट्रोल रूममध्ये काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर अधिक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणाने एक्स्प्रेस वेवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Web Summary : CCTV cameras on the Purvanchal Expressway were misused to film couples, leading to blackmail. Villagers fear for women's safety in fields near the expressway. Employees involved have been fired, and police are investigating the security breach.
Web Summary : पूर्वांचल एक्सप्रेसवे पर सीसीटीवी कैमरों का इस्तेमाल जोड़ों की वीडियो बनाने और उन्हें ब्लैकमेल करने के लिए किया गया। ग्रामीणों को एक्सप्रेसवे के पास खेतों में महिलाओं की सुरक्षा का डर है। शामिल कर्मचारियों को निकाल दिया गया है, और पुलिस सुरक्षा उल्लंघन की जांच कर रही है।