पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी; ३ भाविक ठार, ५० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:08 IST2025-06-30T08:06:53+5:302025-06-30T08:08:29+5:30

ओडिशातील पुरी येथील श्री गुंडिचा मंदिराजवळ रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह ३ ठार ५० हून अधिक लोक जखमी झाले.

Puri Rath Yatra stampede; 3 devotees killed, 50 injured | पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी; ३ भाविक ठार, ५० जखमी

पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी; ३ भाविक ठार, ५० जखमी

पुरी : ओडिशातील पुरी येथील श्री गुंडिचा मंदिराजवळ रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह ३ ठार ५० हून अधिक लोक जखमी झाले. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जगन्नाथ मंदिरापासून तीन किमी अंतरावरील श्री गुंडिच्या मंदिराजवळ हजारो भाविक रथयात्रा पाहाण्यासाठी एकत्र जमलेले असताना पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा ओडिशा सरकारने केली आहे.

विधीसाठी साहित्य घेऊन जाणारे दोन ट्रक भगवान जगन्नाथ त्यांचे बंधू भगवान बलभद्र व देवी सुभद्रा यांच्या रथांजवळील गर्दीच्या ठिकाणी आल्यानंतर गोंधळ उडाला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झाला.

यानंतर राबवलेल्या बचाव अभियाना दरम्यान जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.  या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल भक्तांची माफी मागितली आहे.

Web Title: Puri Rath Yatra stampede; 3 devotees killed, 50 injured