धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:40 IST2025-10-13T13:39:04+5:302025-10-13T13:40:03+5:30
करवा चौथच्या दिवशी एका महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

फोटो - ndtv.in
पंजाबमधील बरनाला येथील तपामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. करवा चौथच्या दिवशी एका महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. आशा राणी असं या ५९ वर्षांच्या महिलेचं नाव असून त्या तपा येथील रहिवासी होत्या. आशा करवा चौथच्या दिवशी खूप आनंदी होत्या. आपल्या मैत्रिणींसोबत नाचत होत्या. अचानक त्या नाचताना खाली कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
५९ वर्षीय आशा राणी सामाजिक कार्य करणाऱ्या कुटुंबातील होत्या आणि कुटुंबासह आनंदी जीवन जगत होत्या. करवा चौथच्या दिवशी आशा राणी यांनी पती तरसेम लाल यांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला होता. त्या संध्याकाळी आपल्या नातीसह कॉलनीत एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आशा राणी मैत्रिणींसोबत डीजे वर नाचत आनंद साजरा करत होत्या. नाचत असताना अचानक हार्ट अटॅक आला आणि जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पती तरसेम लाल यांनी आशा राणी यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दुःखद घटनेने शहरात शोककळा पसरली आहे. आशा राणी शेवटच्या "मौज मस्तियां मान, पता नही की हो ना, कल सुबह नु की होना यार, पता नही की होना" या पंजाबी गाण्यावर नाचत होत्या. याच दरम्यान मृत्यू झाला. करवा चौथच्या दिवशी मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
मुरादाबादच्या बिलारी ब्लॉकमध्ये झालेल्या एका क्रिकेट सामन्यात शेवटचा बॉल टाकल्यानंतर खेळाडूची अचानक तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. बिलारीतील एका मैदानावर ही धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेश वेटरन्स क्रिकेट असोसिएशनने ही टूर्नामेंट आयोजित केली होती.