मुलीने पळून जाऊन केलं लग्न, पंचायतीने प्रेमविवाहावरच घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 01:32 PM2018-05-03T13:32:24+5:302018-05-03T13:32:24+5:30

सगळ्यांनाच धक्का बसेल असा निर्णय पंचायतीने घेतला आहे.

Punjab village ‘bans’ love marriages after couple ties the knot | मुलीने पळून जाऊन केलं लग्न, पंचायतीने प्रेमविवाहावरच घातली बंदी

मुलीने पळून जाऊन केलं लग्न, पंचायतीने प्रेमविवाहावरच घातली बंदी

Next

लुधियाना- एका प्रेमी युगुलाने पळून लाऊन लग्न केल्याची घटना पंजाबमध्ये घडली. या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसेल असा निर्णय पंचायतीने घेतला आहे. चणकोईया खुर्द गावातील ही घटना असून गावाने थेट प्रेमविवाहावर बंदी घालणारा ठरावच मंजूर केला. तसंच या ठरावाचं उल्लंघन करणाऱ्या जोडप्यावर व त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या नातेवाईकांवर बहिष्कार टाकला जाईल, अशी एकप्रकारची धमकी दिली आहे. 

29 एप्रिलला गावातील पंचायतीमध्ये ठराव मांडण्यात आला. गावातील गुरुद्वारा समिती आणि स्पोर्ट्स क्लबनेही या ठरावाला मान्यता दिली. या ठरावानुसार आता गावात प्रेमविवाहावर बंदी असेल. पंचायतीने संमत केलेल्या ठरावात नमूद केलं आहे की, एखाद्या मुलाने किंवा मुलीने त्यांच्या मनानुसार लग्न केलं तर त्यांना समजातून बहिष्कृत केलं जाईल. तसंच दोघांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध ठेवले तर त्यांच्यावरही बहिष्कार टाकला जाईल. दुकानदारांनी त्या जोडप्याला कोणत्याही वस्तू विकता येणार नाही. अशा जोडप्याला गावातील सार्वजनिक जागा वापरता येणार नाही. ग्रामपंचायत तसेच गुरुद्वाराने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा लाभही घेता येणार नाही. पंचायतीच्या या ठरावाची माहिती पत्रकाद्वारे गावातील बस थांबा आणि रस्त्यालगतच्या भिंतीवर लावण्यात आली आहे. 

दरम्यान, पंचायतीच्या या ठरावाचं गावाचे सरपंच हकम सिंग यांनी समर्थन केलं आहे. हा फतवा नसून गावाने एकमताने घेतलेला निर्णय आहे. मुलीचे आजोबा आणि कुटुंबीयांनीच असा ठराव मांडण्याची मागणी केली होती. ठराव मंजूर केला नाही तर आत्मदहन करु असा इशारा त्यांनी दिला होता, असं ते म्हणाले.  दरम्यान, पंचयतीच्या या ठरावाची अंमलबजावणी होणार नसल्याचं कायदेतज्ज्ञांचं मत आहे. संविधानातील मूलभूत अधिकारांचं हे उल्लंघन आहे, असं सामाजिक संघटनांनी म्हटलं आहे. 

Web Title: Punjab village ‘bans’ love marriages after couple ties the knot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.