जत्रेत आला कोट्यवधींचा घोडा, सलमान खाननं लावली बोली, मालकानं दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 22:53 IST2021-02-18T22:48:35+5:302021-02-18T22:53:23+5:30
या जत्रेत चांगल्या जातीचे 300 घोडे आणि घोड्या आल्या होत्या. पंजाब शिवाय राजस्थानच्या जयपूर आणि अजमेरमधूनही येथे घोडे आले होते. या घोड्यांची किंमतही आश्चर्यकारक होती. या जत्रेत चांदी, मारवाडे आणि नुकरा जातीचे घोडे विशेष आकर्षणाचे केंद्र होते. (Punjab, Faridkot)

जत्रेत आला कोट्यवधींचा घोडा, सलमान खाननं लावली बोली, मालकानं दिलं असं उत्तर
चंदीगड -पंजाबच्या फरीदकोट येथे आयोजित घोड्यांच्या जत्रेत पाच लाखांपासून पाच कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेले घोडे आले होते. या जत्रेत एक 'देव' (dev) नावाचा घोडाही आला होता. हा घोडा विकत घेण्यासाठी बॉलीवुड स्टार सलमान खानने ( Salman khan) कोट्यवधींची बोलीही लावली होती. मात्र, सलमान खानची ही बोली या घोड्याच्या मालकाने नाकारली. (Salman khan offers rejected horse owner paramveer)
या जत्रेत देवराज घोड्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. देवराजच्या मालकाचे नाव अमनदीप सन्नी गिल असे आहे. त्यांनी सांगितले, की देवराजपासून जन्माला आलेले पहिले पाच घोडे इंडियन चॅम्पियनशिपमध्ये विजयी झाले आहेत. यावेळी देवराजला विकत घेण्यासाठी अनेकांनी ब्लँक चेकही ऑफर केले. मात्र, त्यांनी हा घोडा विकला नाही. ते म्हणाले, देवराजला आम्ही शोक म्हणून पाळले आहे.
या जत्रेत चांगल्या जातीचे 300 घोडे आणि घोड्या आल्या होत्या. पंजाब शिवाय राजस्थानच्या जयपूर आणि अजमेरमधूनही येथे घोडे आले होते. या घोड्यांची किंमतही आश्चर्यकारक होती. या जत्रेत चांदी, मारवाडे आणि नुकरा जातीचे घोडे विशेष आकर्षणाचे केंद्र होते.
फरीदकोट येथे गोविंद सिंह हॉर्स ब्रीड सोसायटीने आयोजित केलेल्या या जत्रेत घोड्यांच्या शोचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच पशू पालकांना उत्तेजन देणे आणि पशूंच्या जातीत सुधार करणे असा या जत्रेच्या आयोजनाचा हेतू होता.
पंजाब सरकारचे राजकीय सल्लागार तथा फरीदकोटचे आमदार कुशलदीप सिंह ढिल्लो यांनी या जत्रेचे आयोजन केले होते. यात देव आणि परमवीर नावाचे घेडे विशेष आकर्षण होते. या घोड्यांच्या मालकांना सलमान खानने कोट्यवधींची ऑफर दिली होती. मात्र, त्याची ही ऑफर या घोड्यांच्या मालकांनी नाकारली. यावेळी देव घोड्याची किंमत पाच कोटींपर्यंत लावली गेली.