शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

पंजाब, राजस्थानची सरकारं उत्तर प्रदेशप्रमाणे बलात्कार लपवत नाहीत- राहुल गांधी

By कुणाल गवाणकर | Published: October 25, 2020 8:05 AM

भाजप नेत्यांना राहुल गांधींकडून प्रत्युत्तर; उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा

नवी दिल्ली: काँग्रेसशासित पंजाब आणि राजस्थानमधील बलात्कारांच्या घटनांवरून निशाणा साधणाऱ्या भाजप नेत्यांना राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नसल्याचं म्हणत राहुल यांनी भाजपवर पलटवार केला आहे. पंजाब, राजस्थानातल्या पीडितांना न्याय मिळत नसेल तर मी तिथेही जाईन, असं राहुल यांनी म्हटलं आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका सहा वर्षीय दलित मुलीची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. त्यावरूव भाजपनं काँग्रेसवर टीका केली होती.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी राजकीय सभा घेण्याऐवजी पीडित कुटुंबाची भेट घ्यायला हवी होती, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी म्हटलं होतं. राहुल यांनी उत्तर प्रदेशातल्या हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. जावडेकर यांच्या टीकेला राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. 'उत्तर प्रदेशाप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील सरकारं मुलीवर बलात्कार झाल्याचं अमान्य करत नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात नाहीत आणि न्यायाचा मार्ग रोखतही नाहीत. तिथल्या सरकारांनी असं केल्यास मी न्यायासाठी तिथेही जाईन,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजप नेत्यांचे दावे फेटाळून लावले. 'होशियारपूर आणि हाथरसमधील घटना अतिशय वेगळ्या आहेत. त्यांची तुलना होऊ शकत नाही. हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस प्रशासन कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरलं. उलट त्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. पंजाबमधील परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. पंजाब पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींना अटक केली,' असं सिंग म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारBJPभाजपा