Punjab News: कुत्रा मागे लागला, जीव वाचवण्यासाठी 6 वर्षाचा चिमुकला धावला; 200 फुट खोल बोरवेलमध्ये अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 21:54 IST2022-05-22T15:33:58+5:302022-05-22T21:54:59+5:30
Punjab News: पंजाबच्या होशियारपुरमधील गड्डीवालाजवळ ही घटना घडली असून, अंधार पडल्याच्याआत मुलाचा वाचवण्याचे प्रयत्न आहेत.

Punjab News: कुत्रा मागे लागला, जीव वाचवण्यासाठी 6 वर्षाचा चिमुकला धावला; 200 फुट खोल बोरवेलमध्ये अडकला
चंदीगड:पंजाबच्या होशियारपूरमधील गड्डीवाला जवळील एका गावात एक 6 वर्षांचा चिमुकला 200 फूट खोल आणि 8 इंच रुंद बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घ[ली आहे. मुलाचे आई-वडील शेतात काम करत असताना एक कुत्रा मुलाच्या मागे धावला, आपला जीव वाचवण्याच्या नादात मुलगा बोअरमध्ये पडल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली असून, त्या मुलाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचे नाव हृतिक आहे. मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण कर्मचारी आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. 100 फूट अंतरावर मूल अडकले आहे. मुलाच्या प्रत्येक हालचालींवर कॅमेऱ्याने लक्ष ठेवले जात आहे. लाइफ सपोर्ट सिस्टिमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
मुलाला ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी एनडीआरएफची टीम व्यवस्था करत आहे. अंधार पडण्यापूर्वीच मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न टीम करत आहे. अंधार पडल्यानंतर बचाव कार्याला बराच वेळ लागू शकतो. घटनास्थळी स्थानिक लोकांचीही गर्दी आहे. विशेष म्हणजे, 6 जून 2019 रोजी पंजाबच्या संगरूरमध्ये 125 फूट खोल बोअरवेलमध्ये फतेहवीर सिंग हा 2 वर्षांचा मुलगा पडला होता. त्याला वाचवण्यात प्रशासनाला अपयश आले. पण, या ऋतिकला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.