शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सत्तेतील 'आप'ला पडताहेत अब 'दिल्ली दूर नहीं'ची स्वप्ने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 08:03 IST

Punjab Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत युतीच्या वाटाघाटीत भाजपची डाळ न शिजल्याने भाजप आणि शिरोमणी अकाली दल स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी तेराही जागांवर चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

- प्रसाद आर्वीकर 

चंडीगड - लोकसभा निवडणुकीत युतीच्या वाटाघाटीत भाजपची डाळ न शिजल्याने भाजप आणि शिरोमणी अकाली दल स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी तेराही जागांवर चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. या लढतींमध्ये पंजाबमधील सत्तेचा फायदा आम आदमी पार्टी (आप) कसा घेते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वात प्रथम आपने आपल्या ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे आपचा निवडणुकीतील आत्मविश्वास यातून दिसून आला. दुसरीकडे राज्यात कमी ताकद असतानाही अतिआत्मविश्वास भाजपला नडला. मागील २५ वर्षांपासून अकाली दलासोबत असलेली युती तुटली असून, भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेससह आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल आणि भाजप असे चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. आपच्या विरोधात होत असलेली कारवाई पंजाबात मात्र सहानुभूतीची लाट वाढविण्यासाठी साह्यभूत ठरत आहे. या जोरावर लाभ उठवित 'दिल्ली' गाठण्याचे स्वप्न सध्या आप रंगवत आहे.

२०१९च्या निवडणुकीत कोणाला किती जागा?काँग्रेस - ८अकाली दल - २भाजप - २आप - १

भाजपसमोर आव्हानराज्यात सर्वात कमी ताकद असतानाही भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा या राज्यात काय परिणाम होतो, याकडे लक्ष राहणार आहे. याशिवाय शेतकरी आंदोलनातून भाजपने  शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. तीन शेतकरी कायदे रद्द न केल्याने शिरोमणी अकाली दलाने भाजपपासून फारकत घेत शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविली. त्यामुळे भाजपला झगडावे लागणार, असे दिसते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेसShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलpunjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024