शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

विनोद तावडेंनी पंजाबमध्ये AAPला दिला दुहेरी धक्का, विद्यमान खासदार आणि आमदार भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 5:03 PM

Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंजाबमधील सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये दुहेरी धक्का बसला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंजाबमधील सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये दुहेरी धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे जालंधरमधील खासदार सुशील कुमार रिंकू आणि जालंधर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार शीतल अंगुराल यांनी आम आदमी पक्षाला राम राम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांनी आपच्या या विद्यमान आमदार आणि खासदारांना भाजपामध्ये औपचारिक प्रवेश दिला. 

आजच्या पक्षप्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचं बळ आणखी वाढलं आहे. याआधी काँग्रेस नेते आणि खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपाने नुकताच पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपा आणि शिरोमणी अकाली दलामधील आघाडीबाबतची चर्चा फिस्कटल्यानंतर कालच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.

स्वबळावर लढण्याची घोषणा करताना सुनील जाखड म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून करण्यात आलेली विकासकामं सर्वांसमोर आहेत. तसेच मागच्या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांकडील पीक किमान हमीभावामध्ये खरेदी करण्यात आलं, असा दावाही सुनील जाखड यांनी केला आहे.  

टॅग्स :punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024AAPआपBJPभाजपा