'मान'लं राव! CM भगवंत मान यांचं आणखी एक गिफ्ट, ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:44 IST2022-03-22T15:43:36+5:302022-03-22T15:44:13+5:30
पंजाबमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. पंजाबमध्ये ३५,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार

'मान'लं राव! CM भगवंत मान यांचं आणखी एक गिफ्ट, ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी
चंडीगड-
पंजाबमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. पंजाबमध्ये ३५,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी केली आहे. पंजाबमध्ये 'आप'च्या जबरदस्त विजयानंतर भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून मान यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे.
भगवंत मान यांनी पंजाबमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या पहिल्या बैठकीत सरकारी खात्यातील २५ हजार रिक्त पदांची भरती काढण्याची घोषणा केली होती. भगवंत मान यांच्या म्हणण्यानुसार, विभागासाठी या भरतीमध्ये १० हजार पदांचा समावेश आहे, तर १५ हजार पदे वेगवेगळ्या विभागांसाठी असतील. महिनाभरात रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया सुरू होईल.
23 मार्च रोजी सुट्टीची घोषणा
भगवंत मान यांनी २३ मार्चला शहीद दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्चला फाशी देण्यात आली होती. इतकंच नाही तर शासकीय कार्यालयांमध्ये शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावण्याबाबत पंजाब विधानसभेत ठरावही मंजूर करण्यात आला आहे.