शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह आज PM मोदींची भेट घेणार! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 09:44 IST

तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. (Punjab CM Capt Amarinder Singh)

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर पंजाबचेमुख्यमंत्री अमरिंदर सिंग आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी मंगळवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, अमित शाह यांच्याकडे शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता पीएम मोदींच्या भेटीदरम्यान अमरिंदर सिंग कृषी कायदे रद्द करण्यासंदर्भात आग्रह करू शकतात, असा अंदाज लावला जात आहे. (Punjab cm captain Amarinder Singh likely to meet pm modi today)

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता -पंजाबमधील बहुतांश शेतकरी गेल्या वर्षभरापासून नव्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेले तीनही कायदे मागे घेण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षेचा हवाला देत पंतप्रधान मोदींसोबत कायदे रद्द करण्यासंदर्भात चर्चा करू शकतात.

अमित शहा यांची भेट -तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शाह यांना शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात माहिती देताना, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार म्हणाले होते, की अमरिंदर सिंग यांनी शहा यांना विरोधी शक्तींना शेतकऱ्यांच्या रोषाचा गैरफायदा घेण्यापासून रोखण्याचेही आवाहन केले. 

याशिवाय, अमरिंदर सिंग पीएम मोदीसोबत पंजाबच्या सुरक्षिततेसंदर्भातही चर्चा करू शकतात. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 25 कंपन्या आणि सीमा सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) ड्रोनविरोधी उपकरणांची मागणीही केली होती. तसेच, पाकिस्तानी दहशतवादी पंजाबलाही लक्ष्य करू शकतात, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्रीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी