शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी सोडून बलात्कार पीडितेच्या वडिलांनाच ठोठावला पंचायतीने 31,000 रुपयांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 22:08 IST

बिहारमध्ये आरोपीला सोडून बलात्कार पीडितेच्या वडिलांनाच दंडाची शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी दाद मागणा-या तिच्या वडिलांनाच 31,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा येथील गाव पंचायतीने ठोठावली आहे.

नवी दिल्ली, दि. 15 - बिहारमध्ये आरोपीला सोडून बलात्कार पीडितेच्या वडिलांनाच दंडाची शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी दाद मागणा-या तिच्या वडिलांनाच 31,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा येथील गाव पंचायतीने ठोठावली आहे. तसेच, दंडाची रक्कम जर भरली नाही, तर मुलीच्या गळ्यात चपालांचा हार घालून धिंड काढण्यात येईल अशी धमकी पंचायतीच्या सदस्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. ही घटना येथील जामुई गावात घडली आहे. 

गावातील राकेश या तरुणाने मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत केली आहे. यावेळी ते म्हणाले की, गेल्या रविवारी रात्री हा प्रकार घडला. त्यावेळी माझी बायको घराबाहेर गेली होती. दरम्यान, आरोपी राकेश मुलीच्या रुमध्ये आला त्यावेळी त्याला मुलीने विरोध केला आणि आरडाओरडा केला. तेव्हा मी त्याठिकाणी गेलो असता राकेशने मला पाहून भीतीमुळे पळ काढला. मात्र, शेजा-यांनी त्याला पकडले, असे या पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेनंतर आरोपी राकेशला पंचायतीमध्ये हजर करण्यात आले असता, पंचायतीने राकेशला सोडून मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत मलाच 31,000 रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले. तसेच, दंडाची रक्कम जर भरली नाही, तर मुलीच्या गळ्यात चपालांचा हार घालून धिंड काढण्यात येईल अशी धमकी पंचायतीच्या सदस्यांकडून देण्यात आल्याचे ते म्हणाले.    

दरम्यान, आम्ही पंचायतीच्या सदस्यांविरोधात केलेल्या तक्रारीची आणि अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करत आहेत. याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास पंचायत सदस्यांविरोधात आणि बलात्कार करणा-या आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे याप्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिक्षक संजय कुमार यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हा