शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

Pulwama Attack : राजकीय इच्छाशक्ती हवी, गाजर दाखवू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 5:45 AM

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!

राजकीय इच्छाशक्ती हवीदहशतवाद संपवायचा असेल तर प्रथम राजकीय इच्छाशक्ती हवी. आज भारत आणि पाकिस्तान अण्वस्रांनी सज्ज आहेत. पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे काश्मीर यांचे एकीकरण करून मर्यादित स्वायत्तता देता येईल. त्यासाठी आधी तेथील लोकांना स्थैर्याची हमी द्यावी लागेल. मुस्लीम दहशतवादाचा मोठा प्रश्न अफगाणिस्तान आणि इराणमध्येही आहे.- अ‍ॅड. रमाकांत खलप,माजी केंद्रीय कायदामंत्री

गाजर दाखवू नकापंतप्रधान नरेंद्र मोदींना एवढच सांगायचंय की तुमचं राजकारण आणि तुमचा विकास तुमच्याकडेच ठेवा आणि पाकिस्तानला आयुष्यभराची अद्दल घडवा. किमान यावेळेस तरी कोणतं गाजर दाखवू नका.- प्रवीण धुमाळ, पिंपरी चिंचवड, पुणे

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपूर येथे गुरुवारी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे ४२ पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा निषेध सर्वत्र देशात होत आहे.हा हल्ल्याचा फक्त तिव्र निषेध करून चालणार नाही तर कठोर कार्यवाही झाली पाहिजे.त्याच बरोबर या सर्व देश भारतासोबत या दुःखात त्याच्या सोबत असताना चीन मात्र पाकिस्तान ची बाजू घेत आहे.माझे असे मत आहे भारताने चीन च्या भारतातील गुंतवणूक वर बंदी घालावी.काय होईल जी गोस्ट आज मिळत आहे ती उशीरा मिळेल. पण दहशतवाद आणि  दहशतवादि याना पाठबळ देणाऱ्या चागल्या अद्दल घडेल.

नाव:-बादल रमेशराव डकरे पत्ता:-रा. काजळी पोस्ट देऊरवादा ता चांदुर बाजार जिल्हा अमरावती मो.९९७५८४४६३८ 

आईवरी विपत्तीपेलला भार त्यांनीनिधड्या छातीवरतीझेलला वार त्यांनीधन्य ही मातृभूमीतुम्हामुळे वीरांनोओशाळलेत वैरीतुम्हा पुढे वीरांनोनतमस्तक हा देशझुकल्या सार्व मानाजिंकण्यास ‘पुलवामा’ - 

करण माळी,उरळ खु, ता. बाळापूर, जि. अकोला

सरफरोशी की तमन्नाअब हमारे दिल में हैदेखना है, जोर कितनाबाजू - ए - कातिल में है- रश्मी बाळासो नदाफ, उदगाव, शिरोळ, जि. कोल्हापूर.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदTerror Attackदहशतवादी हल्ला