शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

CoronaVirus News: ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 4:55 PM

CoronaVirus News: जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट ९६.९ टक्क्यांवर; देशात सर्वाधिक असल्यानं प्रशासन चिंतेत

पुद्दुचेरी: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. गेल्या मार्च महिन्यापासून देशावर कोरोनाचं संकट आहे. काल दिवसभरात देशात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद झाली. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असताना अनेक राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा कहर सुरू आहे.बाटलीत मूत आणि त्यानंच हात धू; सॅनिटायझर मागणाऱ्या कोरोना रुग्णाला अधिकाऱ्याचं उर्मट उत्तरकेंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये कोरोना वेगानं हातपाय पसरत आहे. गेल्या २४ तासांत २ हजार ४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरीत सध्या १४ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुद्दुचेरीतल्या यनम जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट देशात सर्वाधिक आहे. इथे होणाऱ्या एकूण कोरोना चाचण्यांपैकी ९६.९ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.Fact Check: कोरोनाची 'थर्ड स्टेज' अन् कलेक्टरच्या 'त्या' २० सूचना; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्यकोरोना पॉझिटिव्हिटी दर जास्त असणं याचा अर्थ चाचण्या होत असलेल्या रुग्णांची अवस्था गंभीर असून ते आतापर्यंत समोर आलेले नाहीत असा होतो. आदर्श स्थितीत हा दर ५ टक्क्यांच्या खाली असायला हवा. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांखाली असल्यास याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात आहे असा होतो. पुद्दुचेरीच्या यनम जिल्ह्यात हा रेट जवळपास १०० टक्के आहे. गेल्या आठवड्यात देशातील १७ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट ४८ टक्क्यांच्या वर होता. यातील बहुतांश जिल्ह्यात ग्रामीण भाग अधिक आहे.काल दिवसभरात ३० रुग्णांचा मृत्यूपुद्दुचेरीत काल दिवसभरात ३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एका १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या मुलीला मधुमेह होता. याशिवाय मृतांमध्ये एका २५ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. तिला कोणताही आजार नव्हता. पुद्दुचेरीत आतापर्यंत कोरोनाच्या ७५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ५९ हजार १७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुद्दुचेरीचा रिकव्हरी रेट देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या