शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

खरे PUBG लवर! गेम खेळताना प्रेमाचं मिशन पूर्ण झालं; एकत्र आयुष्य घालवण्यासाठी थेट लग्नच केलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 15:37 IST

PUBG Lover : दोन अनोळखी लोक PUBG खेळताना एकमेकांना ऑनलाईन भेटले. त्यांचं बोलणं सुरू झालं आणि दोघंही प्रेमात पडले.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सोशल मीडियावर अनेक एक एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण आता ऑनलाईन PUBG  खेळताना दोन अनोळखी व्यक्ती प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. दोन अनोळखी लोक PUBG खेळताना एकमेकांना ऑनलाईन भेटले. त्यांचं बोलणं सुरू झालं आणि दोघंही प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये ही घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या एका तरुणीचं PUBG खेळताना बंगालच्या एका तरुणावर प्रेम जडलं. यानंतर तरुणीने हैराण करणारं काम केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकमधीलल फ्रिजा नावाच्या एका तरुणीला पब्जी खेळायला आवडायचं. ती ऑनलाईन पब्जी खेळत असे. पब्जी खेळतानाच तिची ओळख पश्चिम बंगालच्या धूपगुडी येथे राहणाऱ्या सैनूर आलम नावाच्या मुलासोबत ऑनलाईनच झाली. पब्जी खेळतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 

PUBG खेळता खेळता प्रेम जडलं

प्रेमात पडल्यावर दोघांनीही एकमेकांसोबत आपला मोबाईल नंबर शेअर केला. यानंतर दोघंही बराच वेळ फोनवर बोलत असे. याआधी दोघंही कधीच एकमेकांना भेटले नव्हते. गेमच्या माध्यमातूनत त्यांची ओळख झाली होती. एकमेकांसोबत फोनवर बोलत असतानाच फ्रिजा आणि सैनूर एकमेकांच्या प्रेमात बुडाले. याच दरम्यान फ्रिजाने एक निर्णय घेतला आणि मोठं पाऊल उचललं. एक दिवस फ्रिजा कर्नाटकातून विमानाने सैनूर आलमच्या धूपगुडी गावात पोहोचली. 

त्याच्यासाठी घरदार सोडलं अन् असं काही घडलं...

फ्रिजा थेट या तरुणाच्या घरी गेली. यानंतर सैनूरने जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तरुणीला अचानक आपल्या घराबाहेर पाहून तरुणाच्या घरातील लोकही हैराण झाले. यानंतर दोघांची लव्ह स्टोरी घरच्यांनाही समजली. यानंतर मुलीच्या घरच्यांना बोलावलं गेलं आणि दोन्ही कुटुंबीयांनी मिळून अतिशय उत्साहात दोघांचंही लग्न लावून दिलं. सध्या यांच्या या प्रेमकहाणीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेम