शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

PUBG बॅन झाला म्हणून काय झाले? हे एकसो एक गेम आहेत ना...खेळा आनंद लुटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 8:05 PM

PUBG Banned: केंद्र सरकारने आज तिसऱ्यांदा चिनी अॅप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. याचा जोरदार फटका पब्जी खेळणाऱ्या करोडो भारतीयांना बसला आहे.

केंद्र सरकारने आज तिसऱ्यांदा चिनी अॅप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. टिकटॉक, वुई चॅटनंतर आता पब्जी(PUBG) सह 118 अॅप्स बॅन केली आहेत. याचा जोरदार फटका पब्जी खेळणाऱ्या करोडो भारतीयांना बसला आहे. तरुणांमध्ये याचीच चर्चा होत आहे. जणूकाही पब्जीने या तरुणांना मोबाईल गेम्सचे व्यसनच लावले होते. आता PUBG बॅन झाला म्हणून काय झाले, आम्ही तुम्हाला अशाच काही चांगल्या गेम्सची माहिती देणार आहोत. 

गरेना फ्री फायर (Garena Free Fire) हा बॅटल रॉयल गेम ाहे. जो 111 डॉट्स स्टुडीओ आणि सिंगापूरच्या गरेना कंपनीने बनविला आहे. हा गेम 2019 मध्ये जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केलेला मोबाईल गेम आहे. गुगल प्लेवरही या गेमला "Best Popular Game" चा किताब मिळाला होता. 

दुसरा गेम म्हणजे फ्रंटनाईट (Fortnite). फ्रंटनाईट हा गेम अमेरिकन कंपनीने तयार केलेला आहे. इपिक गेम्सनावाची ही कंपनी आहे. हा गेम 2017 मध्ये लाँच झाला होता.  हा गेम तीन गेम मोडमध्ये उपलब्ध आहे. या तिन्ही गेममध्ये एकसारखाच गेमप्ले आणि गेम इंजिन आहे. Fortnite: Save the World, Fortnite Battle Royale, आणि Fortnite Creative असे हे गेम मोड आहेत. 

 

पब्जीवर बंदीमोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पबजीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास १०० हून अधिक मोबाईल अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आणखी ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला आहे. पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अ‍ॅप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. 'या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.याआधी मोदी सरकारनं टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जूनच्या अखेरीस टिकटॉक, हेलोसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सरकारनं पबजीसह लिविक, वीचॅट वर्क, वीचॅट रिडिंग, अ‍ॅपलॉक, कॅरम फ्रेंड्स यासारख्या मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमgoogleगुगलCentral Governmentकेंद्र सरकारindia china faceoffभारत-चीन तणाव