शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी अवघी हजारांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 6:21 AM

अर्थसंकल्पात पुसली पाने : कल्याण-कसारा मार्गासाठी १६० कोटी; कर्जत मार्गाकडे दुर्लक्ष

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी काही लाखांची तरतूद करण्यात आल्याने रेल्वेने यंदाच्या वर्षी हा प्रकल्प बासनात गुंडाळल्याची चर्चा आहे. कल्याण-कर्जत मार्गाच्या विस्तारासाठीही यंदा तरतूद नाही. कल्याण-कसारा मार्गाच्या विस्तारीकरणासाठी १६० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले.राज्यातील प्रकल्पांत लातूर कोच फॅक्टरीसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आहे. त्याशिवाय मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी २८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २३ टक्क्यांची जादा तरतूद करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. मध्य रेल्वेसाठी एकूण ७ हजार ९५५ कोटींची तरतूद आहे, तर तीन हजार ७६० कोटी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, दुहेरी मार्गिका, कोंडीतून सुटकेसाठी दिले जाणार आहेत. अत्याधुनिक सिग्नल प्रणाली, संरक्षक भिंत, एकात्मिक सुरक्षा प्रणाली, रेल्वे कर्मचाºयांच्या सुविधेसाठीही तरतूद करण्यात आली आहे.

सुरक्षा प्रकल्पांसाठी निधीच्मध्य रेल्वे झोनमधील ११ स्थानकांत अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासाठी ४०.४५ कोटी खर्च अपेक्षित असून, २.२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.च्मेमू, डेमू आणि उपनगरीय लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासाठी ३५६.७१ कोटींचा खर्च अपेक्षित असून, फक्त पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.च्रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी सुरक्षा भिंत उभारण्यासाठी ३० कोटींचा खर्च अपेक्षित असून, १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.च्प्रवाशांच्या सुविधेसाठी २८४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी २०४ कोटींची तरतूद करण्यात आली होती.
बोगदा आणि पुलांच्याकामासाठी तरतूदकर्जत ते लोणावळा २.३ कोटीकल्याण ते इगतपुरी १ कोटीकल्याण ते कर्जत १.५ कोटीतांत्रिक दुरुस्तीसाठी तरतूदच्मुंबई विभागातील सिग्नल प्रणाली अत्याधुनिक करण्यासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यातआली आहे.च्मध्य रेल्वे झोनमध्ये ३७२ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. यासाठी एकूण खर्च ३७२ कोटी रुपये असून, २८ कोटी रुपये मंजुरी मिळाली आहे.च्ओव्हर हेड वायरच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.च्एलटीटी, वाडीबंदर, कल्याण, माटुंगा येथील वर्कशॉप आणि शेडसाठी २२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.हे प्रकल्प लागणार मार्गीच्कल्याण-कसारा या ६७.६२ कि.मी. तिसºया मार्गिकेसाठी एकूण ९१३ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून, त्यासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.च्लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कोचिंग सुविधा वाढविण्यासाठी ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ४९.९६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.च्पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनसच्या पहिल्या टप्प्यासाठी ११८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

च्सीएसएमटी स्थानकावर २४ डब्यांच्या मेल, एक्स्प्रेसना थांबा देण्यासाठी स्थानकाचा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये १० ते १३ फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्च ११४ कोटी रुपये असून, ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.च्एटीव्हीएम मशिनची संख्या प्रत्येक स्थानकावर वाढविण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्च ४९.५५ असून, १.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.च्११० स्थानकांवर ३३७ स्मार्ट कार्ड असलेली एटीव्हीएम मशिन बसविण्यात येणार आहेत. यासाठी एकूण खर्च ६.३ कोटी रुपये असून, ३.१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.च्मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग १६० ते २०० किमी वेगासाठी सक्षम करण्याकरिता ५०० कोटींची तरतूद.च्विरार-अंधेरी धिम्या मार्गावरील १५ डब्यांच्या लोकलसाठी १२ कोटी.च्विक्रोळी येथील रोड ओव्हर ब्रीजसाठी ४ कोटी आणि दिवा येथील रोड ओव्हर ब्रीजसाठी ६ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019railwayरेल्वे