म्हसणे टोलनाक्यावर ठिय्या अपूर्ण कामांचा निषेध : स्थानिकांना कामावर घेण्याची मागणी
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:45+5:302015-02-16T21:12:45+5:30
सुपा : नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाट्यावर असलेल्या चेतक एन्टरप्राईजेसच्या टोलनाक्यावर परिसरातील वाहनधारकांची लूट होत असल्याचा आरोप करीत कामे अपूर्ण असतानाच टोल वसुली होत असल्याच्या निषेधार्थ पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले़

म्हसणे टोलनाक्यावर ठिय्या अपूर्ण कामांचा निषेध : स्थानिकांना कामावर घेण्याची मागणी
स पा : नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाट्यावर असलेल्या चेतक एन्टरप्राईजेसच्या टोलनाक्यावर परिसरातील वाहनधारकांची लूट होत असल्याचा आरोप करीत कामे अपूर्ण असतानाच टोल वसुली होत असल्याच्या निषेधार्थ पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले़पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे नगर-पुणे मार्गावर चेतक कंपनीने टोल नाका उभारला आहे़ या कंपनीकडून रस्त्याची विविध कामे प्रलंबित असतानाही टोल वसुली केली जात आहे़ तसेच स्थानिकांना कामावरुन काढले आहे़ कंपनीच्या या मनमानीविरोधात सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले़ नारायणगव्हाणमधील चौपदरीकरणाचे रखडलेले काम सुरु करावे, पाच हजार वृक्षांची लागवड करावी, स्थानिकांना रोजगार द्यावा, साईडपट्ट्या कराव्यात, उखडलेला रस्ता दुरुस्त करावा, या मागण्यांसाठी टोलनाक्यावर सुमारे अर्धा तास टोल बंद आंदोलन करण्यात आले. तेथे पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर चेतक कंपनीच्या दालनात तासभर कंपनीच्या अधिकार्यांसमोर ठिय्या देण्यात आला. परिसरातील गावांना टोलमाफी असली तरी कंपनीच्या वतीने वसुली केली जाते़ त्यांचा सामान्य माणसांना त्रास होतो. नारायणगव्हाण गावाजवळचा रस्ता चौपदरी करण्याबाबत अनेक आंदोलने होऊनही त्यात बांधकाम विभाग व कंत्राटदार कोणतीच हालचाल करीत नाही. या गावामध्ये दुपदरी रस्ता असल्याने अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे़ अनेक युवकांनी यापूर्वी उपोषणेही केली आहेत. तरीपण अद्याप चौपदरीकरणाचे काम होत नसल्याबाबत शेळके यांनी बांधकाम विभागाचे अभियंता पवार यांना धारेवर धरले़चेतक एंटरप्राईजेसने टोलनाक्यावर पूर्वी स्थानिक युवकांना रोजगार दिला होता. पण कंपनीने त्यांना डच्चू देऊन परप्रांतीयांना काम दिल्याने स्थानिक युवकांवर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे, असे शेळके यांनी तहसीलदार देशमुख, मंडलाधिकारी राजाराम गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिले़ बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता खैरे यांनी नारायणगव्हाणमधील चौपदरीकरणाबाबत प्रस्ताव पाठविला आहे,साईडपट्ट्या व इतर कामे लवकरच करून घेण्यात येतील, पाच हजार झाडे पावसाळ्यात लावली जातील, शौचालये व स्वच्छतागृहे बांधण्याचा लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. तर कंपनीचे व्यवस्थापक पांडे व राजेश मोगरा यांनी वरिष्ठांशी चर्चा करून दहा दिवसात आपल्या मागण्यांबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी अशोक शेळके, कानिफनाथ पोपळघट आदींसह युवक उपस्थित होते.