शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

द्वेष पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; सुप्रीम कोर्टाचा राज्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 06:46 IST

सुप्रीम कोर्टाचा राज्यांना आदेश; तक्रारीची वाट पाहू नका, विलंब ठरेल अवमान

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विद्वेषी वक्तव्ये करणारे कोणत्या धर्माचे आहेत याचा विचार न करता, त्यांच्या विरोधात राज्यांनी स्वत: दखल घेऊन गुन्हे दाखल करावेत, असा आदेश सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिला. याबाबत कोणीतरी तक्रार करेल याची वाट न पाहता राज्यांनी कारवाई करावी. त्या कृतीस विलंब झाला, तर तो कोर्टाचा अवमान समजला जाईल, असेही बजावले आहे.

न्या. के.एम. जोसेफ व न्या. बी.व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, देशाने स्वीकारलेले धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व धोक्यात येईल, अशी विद्वेषी वक्तव्ये करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. 

सर्व धर्मांसाठी लागूn अशा वक्तव्यांसंदर्भातील  प्रकरणात कोर्टाने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी आदेश दिला होता. त्याचे स्वरूप विस्तारून तो आता सर्व धर्मांतील व्यक्तींसाठी लागू केला जाईल, असे कोर्टाने म्हटले. n विद्वेषी वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात कारवाईचे कोर्टाने दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांना द्यावेत, अशी याचिका शाहीन अब्दुल्ला यांनी दाखल केली. अशा कारवाईबाबतचा आदेश सर्व राज्यांना लागू व्हावा, अशी विनंती त्यांनी या याचिकेत केली आहे. 

काही राज्यांचे वर्तन धक्कादायक

n कोर्टाने म्हटले की, धर्माच्या नावावर आपण कुठे चाललो आहोत?  धर्माचे केलेले अवमूल्यन अतिशय दु:खद आहे. तटस्थ भूमिका घेणाऱ्या देशात काही राज्यांचे वर्तन धक्कादायक आहे. 

n विद्वेषी वक्तव्यांबद्दल तक्रार दाखल होण्याची वाट न पाहता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली या राज्यांनी संबंधित आरोपींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

न्यायाधीश अराजकीय, त्यांची बांधीलकी राज्यघटनेशीन्यायाधीश हे अराजकीय आहेत. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसतात. भारतीय राज्यघटनेशी त्यांची बांधीलकी असते. देशाच्या विविध भागांतून विद्वेषी वक्तव्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. भारतामध्ये कायद्याचे राज्य टिकून राहावे व सार्वजनिक हित डोळ्यासमोर ठेवून या याचिकांवर सुनावणी होत आहे.     - सर्वोच्च न्यायालय

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयReligious programmeधार्मिक कार्यक्रमHinduहिंदूPoliceपोलिस