स्नेहसंमेलन आणि व्हायब्रंट बॉर्डर टुरिझमला चालना मिळावी - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 18:59 IST2022-12-05T18:57:35+5:302022-12-05T18:59:19+5:30
Narendra Modi : आगामी विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत भाजप 2 दिवस विचारमंथन करणार आहे.

स्नेहसंमेलन आणि व्हायब्रंट बॉर्डर टुरिझमला चालना मिळावी - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : स्नेहसंमेलन आणि व्हायब्रंट बॉर्डर टुरिझमवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले आहे. सोमवारी नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी काशी-तमिळ संगमच्या धर्तीवर देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यातून देशाच्या भाषा आणि संस्कृतीचा अधिकाधिक प्रचार होईल आणि एकताही वाढेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आगामी विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत भाजप 2 दिवस विचारमंथन करणार आहे. आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हायब्रंट बॉर्डर टुरिस्टला प्रोत्साहन देण्याबाबतही भाष्य केले. दुर्गम सीमावर्ती भाग मुख्य प्रवाहाशी जोडला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने तेथील लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. याबाबतही प्रयत्न व्हायला हवेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
याचबरोबर, जी-20 चे अध्यक्षपद भारताला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यामध्ये सर्वांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. जी-20 ही भारतासाठी मोठी संधी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण आपली सभ्यता आणि संस्कृती जगासमोर चांगल्या प्रकारे दाखवू शकतो.
यासोबतच भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना महामारी आणि युक्रेन संकट असतानाही भारत जगासमोर एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकीत बूथ सक्षमीकरण कार्यक्रम व्यापक पातळीवर प्रभावी करण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.