प्रचारावरील निर्बंधांचा विमानांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 05:34 IST2022-01-25T05:34:02+5:302022-01-25T05:34:14+5:30
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चार्टर विमानसेवेला प्रचंड मागणी असते. व्हीआयपी, नेतेमंडळी, स्टार प्रचारक इत्यादींना एका दिवसात अनेक ठिकाणी प्रचारसभा घ्यायच्या असतात

प्रचारावरील निर्बंधांचा विमानांना फटका
नवी दिल्ली : काेराेनामुळे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, यामुळे खासगी चार्टर विमानसेवा पुरविणाऱ्यांचा व्यवसाय प्रभावित झाला आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चार्टर विमानसेवेला प्रचंड मागणी असते. व्हीआयपी, नेतेमंडळी, स्टार प्रचारक इत्यादींना एका दिवसात अनेक ठिकाणी प्रचारसभा घ्यायच्या असतात. त्यांना लवकर पाेहाेचता यावे, यासाठी शक्य तिथे चार्टर विमाने भाड्याने घेतली जातात. मात्र, प्रचारावर निर्बंध असल्यामुळे यंदा चार्टर विमानांची मागणी कमी झाली आहे. क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी सांगितले की, निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या प्रवास कमी हाेत आहे. निवडणूक आयाेगाने प्रचारसभांवर निर्बंध लावल्यामुळे बहुतांश बुकिंग रद्द झाले आहे.