शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जेल परिसर मर्यादेत घट विकासाला गती : प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 23:13 IST

सोलापूर : शहरातील जिल्हा कारागृहाच्या (जेल) परिसर मर्यादेत घट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यामुळे शहर विकासासाठी लादलेले निर्बंधही उठवण्यात आले आहेत़ आ़ प्रणिती शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी मांडून आवाज उठवला होता़

सोलापूर : शहरातील जिल्हा कारागृहाच्या (जेल) परिसर मर्यादेत घट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यामुळे शहर विकासासाठी लादलेले निर्बंधही उठवण्यात आले आहेत़ आ़ प्रणिती शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी मांडून आवाज उठवला होता़
शासन निर्णयाने हिवाळी अधिवेशनात आ़ प्रणिती शिंदे यांनी जेल परिसरास बांधकाम आणि विकासाला अडसर ठरणारी परिसर मर्यादा घटवण्यात यावी़ नॅशनल जेल मॅन्युअलप्रमाणे ती लागू करावी, अशी मागणी केली होती़ विधिमंडळातील सर्वच आमदारांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मार्च पूर्वी मर्यादेची अट शिथिल करण्याचे मान्य केले होते़ यासंदर्भात मर्यादा घटवलेला शासन आदेश जारी करण्यात आला आहे़ या आदेशामुळे मध्यवर्ती कारागृह १५० मीटर, जिल्हा कारागृह १०० मीटर, तालुका कारागृह ५० मीटरपर्यंत परिसर मर्यादा घटवण्यात आली आहे़
सोलापूर शहरात जेलरोड, किडवाई चौकाजवळील जिल्हा कारागृहाच्या परिसरात ५०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम व विकासासाठी निर्बंध लादण्यात आले होते़ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कारागृह असल्यामुळे त्याच्या ५०० मीटर परिघातील विकासाला खीळ बसली होती़ याचा शहराच्या विकासावर अनिष्ट परिणाम होणार होता़ याकडे आ़ प्रणिती शिंदे यांनी शासनाचे लक्ष वेधले़ (प्रतिनिधी)

इन्फो --
या होत्या मागण्या
* शहरातील कारागृहे शहराबाहेर हटवणे़
* क्षमतेइतकेच कैदी कारागृहात ठेवणे़
* कारागृह परिसर मर्यादा घटवणे़

कोट -
कारागृहासभोवतालच्या ५०० मीटर अंतरामध्ये बांधकाम आणि विकासकामे करण्याचे निर्बंध लादल्याने त्या परिसरातील नागरिक हवालदिल झाले होते़ शहराच्या विकासावर या कायद्याचा थेट परिणाम झाला होता़ त्यामुळे कायदा बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला मुख्यमंत्र्यांनीही प्रतिसाद दिला़
- आ़ प्रणिती शिंदे