प्रज्ञा - वेतन वेळेत न दिल्यास आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:19+5:302015-07-31T22:25:19+5:30
सासवड : गेल्या वर्षभरापासून पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे दरमहा वेतन नेहमीच उशिरा होत आहे. याविषयी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याकडे निवेदन सादर करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असल्याची माहिती शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

प्रज्ञा - वेतन वेळेत न दिल्यास आंदोलनाचा इशारा
द ंडोरी, त्र्यंबकसह समर्थ केंद्रांवर लाखोंची मांदियाळीनाशिक : श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे दिंडोरीतील प्रधान केंद्र आणि त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरूपीठासह राज्य व राज्याबाहेरील भारतातील सर्व समर्थ केंद्रांवर शुक्रवारी गुरूपौर्णिमा उत्सव प्रचंड उत्साहात, तेवढ्याच भावपूर्ण व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरू मानले. दिंडोरीत अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वरमध्ये चंद्रकांत दादा मोरे यांनी भाविकांशी हितगुज करून गुरूपौर्णिमेचा संदेश दिला. यानिमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रमांचा शुभारंभही झाला.अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाअंतर्गत राज्य, राज्याबाहेर व देशाच्या बाहेर शेकडो केंद्र असून लाखो सेवेकरी सक्रिय आहेत. या सर्वांच्या दृष्टीने गुरूपौर्णिमा उत्सवास अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणूनच सर्वजण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिंडोरी व त्र्यंबकमध्ये गुरूपौर्णिमेस प्रचंड गर्दी होणार हे निश्चित होते म्हणूनच सेवामार्गाच्या वतीने यावर्षी सोमवारपासूनच या उत्सवाचे (आषाढी एकादशीपासून) आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीपासूनच समर्थ सेवेकरी व भाविकांनी दिंडोरी व त्र्यंबकमध्ये गर्दी केली होती. आजच्या मुख्य कार्यक्रमासाठी सेवेकरी व भाविकांनी पहाटेपासून दिंडोरी, त्र्यंबकसह सर्वच समर्थ केंद्रांवर गर्दी करीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेतले. दिवसभर सर्वच केंद्रांवर अबालवृद्ध सेवेकरी, भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. आज दिवसभरात दिंडोरी व त्र्यंबकमध्ये लाखोंनी हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला.दिंडोरी केंद्रात अण्णासाहेब मोरे यांनी तर त्र्यंबक गुरूपीठात चंद्रकांतदादा मोरे यांनी गुरूपादुका पूजन तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे षोडशोपचार पूजन केले. सकाळी भूपाळी आरती व साडेदहा वाजता नैवद्य आरतीची सेवा लाखो सेवेकरांनी रूजू केला. सर्वच केंद्रांवर श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आपले गुरूपद सोपविण्याचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धरित्या सुरू होता. महिला-पुरुष भाविकांनी रांगेत येवून श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक केला.केंद्रात व आपआपल्या घरी यानिमित्ताने महिला, पुरुष सेवेकर्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत, तेजोनिधी या ग्रंथाची पारायणे केली. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला. श्रीसृक्त, पुरुषसृक्त, रूद्र सुक्ताचे वाचन केले. अशाप्रकारे दिवसभर सेवेकर्यांनी सेवेची पर्वणीच साधली.