शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

52 मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची प्रक्रिया पूर्ण, मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार वॉर टीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 9:19 AM

पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ५२ मंत्र्यांचे दहा उपगटात विभाजन करुन प्रत्येक गटाच्या दिवसभर बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. 

नवी दिल्ली : विरोधी पक्ष २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपशी कशी मुकाबला करण्यासाठी समान रणनीती आखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील ५२ मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम पूर्ण केले आहे. जवळपास महिनाभर ही प्रक्रिया चालली. तथापि, ५३ वे मंत्री रमेश पोखरिया निशंक हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा संभाव्य फेरबदल होईल तेव्हा यातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीची पंतप्रधानांची वॉर टीम दिसेल. (The process of reviewing the performance of 52 ministers has been completed, Modi will get a war team for the upcoming Lok Sabha elections)पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ५२ मंत्र्यांचे दहा उपगटात विभाजन करुन प्रत्येक गटाच्या दिवसभर बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ पर्यंत मार्गी लावण्यास पंतप्रधान उत्सूक आहेत. त्याचप्रमाणे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी भारत २०२३ मध्ये प्रथमताच आयोजित करीत असलेल्या जी-२० शिखर परिषदेच्या तयारीबाबत ठळकपणे उल्लेख केला. त्यासाठी ते महिन्यातील २० दिवस दौरे करीत आहेत.

किमान दोन प्रकल्प पूर्ण करावे लागणारलोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या जनतेपुढे प्रदर्शित करता येतील, असे किमान दोन प्रकल्प प्रत्येक मंत्रालयाला पूर्ण करावे लागतील, असे पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयानान स्पष्ट केले होते. २०२४ हे सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष असल्याने हे सर्व प्रकल्प ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण झाले पाहिजेत, असे पंतप्रधानांनी या मुक्त चर्चेत सर्व मंत्रालयांना आवर्जून सांगितले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाministerमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकार