शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, संपादक अन् ७ वेळा खासदार... जाणून घ्या कोण आहेत हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:59 IST

Bhartruhari Mahtab : ओडिशाचे दिग्गज नेते भर्तृहरी महताब यांना १८ व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

नवी दिल्ली :  १८ व्या लोकसभेचे संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. हे सत्र सुरू होताच भर्तृहरी महताब यांचे नाव चर्चेत आहे. हे नाव गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. भर्तृहरी महताब यांच्या नावावरून विरोधी पक्षाचे नेते केंद्रातील मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत, भर्तृहरी महताब? जे अचानक चर्चेत आले आहेत.

ओडिशाचे दिग्गज नेते भर्तृहरी महताब यांना १८ व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले आहे. ते सलग सात वेळा खासदार राहिले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी भर्तृहरी महताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. यानंतर भर्तृहरी महताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि नितीन गडकरी यांना लोकसभा सदस्यांची शपथ दिली.

ओडिया दैनिकाचे संपादकभर्तृहरी महताब हे ओडिशातील एका मोठ्या राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील हरेकृष्ण महताब हे ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री होते. भर्तृहरी महताब यांचा जन्म १९५७ मध्ये झाला. सुरुवातीचे शिक्षण भद्रकमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी उत्कल विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. भर्तृहरी महताब हे प्रजातंत्र या त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या ओडिया दैनिकाचे मालक आहे. याशिवाय ते या वृत्तपत्राचे संपादकही आहेत.

बीजेडीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केलाभर्तृहरी महताब हे ओडिशाच्या कटक मतदारसंघातून ७ वेळा खासदार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिजू जनता दलात (बीजेडी) होते. बीजेडीकडून ते अनेकवेळा खासदार म्हणून निवडून आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी  भर्तृहरी महताब यांनी बीजेडीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने कटकमधून भर्तृहरी महताब यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत भर्तृहरी महताब यांनी ५७,०७७ मतांनी विजय मिळवला आणि सलग सातव्यांदा लोकसभेत पोहोचले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपा