Video: देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी; उपस्थितांची मोदींच्या नावानं घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 16:23 IST2019-03-19T16:19:16+5:302019-03-19T16:23:06+5:30

प्रियंका गांधी मंदिरात असताना मंदिराबाहेर 'हर-हर मोदी, घर-घर मोदी'च्या घोषणा

Priyanka Gandhi visits Vindhyavasini temple crowd chants Modi Modi | Video: देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी; उपस्थितांची मोदींच्या नावानं घोषणाबाजी

Video: देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी; उपस्थितांची मोदींच्या नावानं घोषणाबाजी

मिर्झापूर: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील विंध्ववासिनी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यांनी मंदिरात पूजादेखील केली. यावेळी काहींनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. काही उत्साही लोकांनी 'हर-हर मोदी, घर-घर मोदी' अशा घोषणा दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रियंका गांधींनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. त्यांच्याकडे पक्षानं उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली आहे.

प्रियंका गांधींच्या बोट यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ख्वाजा इस्माइल चिश्ती दर्ग्याला भेट दिली. यानंतर त्या विंध्ववासिनी मंदिरात पोहोचल्या. या ठिकाणी त्यांनी विंध्ववासिनी देवीचं दर्शन घेतलं आणि पूजाही केली. यावेळी प्रियंका गांधींसमोर लोकांनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. मंदिराबाहेर उभ्या असलेल्या काहींनी तर 'हर-हर मोदी, घर-घर मोदी' अशा घोषणादेखील दिल्या. 




प्रियंका गांधींनी मिर्झापूर दौऱ्यादरम्यान राधे कृष्ण मंदिरालादेखील भेट दिली. या ठिकाणी पूजा केल्यानंतर त्यांनी नोंदवहीत 'जय माता दी' लिहिलं. यानंतर त्या भटौलीमध्ये लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. याशिवाय सिंधौलामध्ये शेतकऱ्यांची चर्चा करणार आहेत. प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत संवादही साधणार आहेत. 

Web Title: Priyanka Gandhi visits Vindhyavasini temple crowd chants Modi Modi