प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:56 IST2025-12-30T11:54:33+5:302025-12-30T11:56:07+5:30
Raihan Vadra Engagement With Aviva Baig: प्रियंका गांधींच्या होणाऱ्या सुनबाईबद्दल जाणून घ्या...

प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Raihan Vadra Engagement With Aviva Baig: काँग्रेस महासचिव आणि खासदार प्रियंका गांधी व उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेहान वाड्राने आपली लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड अवीवा बेग हिला नुकतीच लग्नाची मागणी घातली असून, अवीवानेदेखील होकार दिला आहे.
कोण आहे अवीवा बेग?
अवीवा बेग व्यावसायिक फोटोग्राफर असून, एटेलियर 11 या फोटोग्राफिक स्टुडिओ व प्रॉडक्शन कंपनीची सह-संस्थापक आहे. ही कंपनी देशभरातील विविध एजन्सी, ब्रँड्स आणि क्लायंट्ससोबत काम करते. याशिवाय, अवीवाने अनेक नामांकित कला प्रदर्शनांत सहभाग घेतला आहे. 2023 मध्ये मेथड गॅलरीसोबत ‘यू कॅनॉट मिस दिस’ या प्रदर्शनात तिच्या कलाकृती सादर झाल्या होत्या. तर, याच वर्षी इंडिया आर्ट फेअरच्या यंग कलेक्टर प्रोग्रामअंतर्गतही तिने आपले काम प्रदर्शित केले.
रेहान काय करतो?
24 वर्षीय रेहान वाड्रा राजकारणापासून दूर राहतो. त्याला लहानपणापासूनच कला आणि फोटोग्राफीमध्ये रस आहे. त्याने दिल्ली, डेहराडून आणि लंडन (SOAS विद्यापीठ) येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि तो व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून काम करतो. रेहानला प्रवास आणि नेचर फोटोग्राफीमध्ये विशेष रस आहे. तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून, आपले विविध फोटोज शेअर करत असतो. रेहानने विविध कला प्रदर्शनही भरवली आहेत.
लग्न कधी?
रेहान वाड्रा आणि अवीवा बेग यांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. सूत्रांच्या मते, लग्नाबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही कुटुंबे परस्पर सल्लामसलत करून आणि सोयीने घेतील.