Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:00 IST2025-12-15T10:59:40+5:302025-12-15T11:00:53+5:30
Prashant Kishor meets Priyanka Gandhi: बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी अचानक काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली.

Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
पूर्वीचे राजकीय रणनीतीकार आणि जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोरकाँग्रेस सोबत येण्याची शक्यता आहे का? अशी चर्चा राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू झाली. या चर्चेला तोंड फुटण्याचे कारण म्हणजे प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची घेतलेली भेट! बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना होत नाही, तोच या दोघांची भेट झाली. या गोपनीय भेटीचे आता अनेक अर्थ लावले जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. प्रशांत किशोर यांच्या पदरी निराशाच आली. या निकालाबद्दलची नाराजी प्रशांत किशोर यांनीही व्यक्त केली. या निकालाला महिना लोटत नाही, तोच किशोर यांनी काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियंका गांधी यांची भेट घेतली. बिहारमध्ये जनसुराज पक्षाला एकही जागा मिळाली नाही, तर काँग्रेसची कामगिरीही चांगली राहिली नाही. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटींने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या बैठकीमध्ये बिहारमधील राजकारण, विरोधी पक्षांची रणनीती आणि भविष्यामधील शक्यता, यावर चर्चा झाली.
प्रशांत किशोर, काँग्रेस एकत्र येणार?
काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्या पक्षातील नेत्यांकडून असे सांगितले जात आहे की, ही शिष्टाचार भेट होती. पण, गेल्या काही वर्षात राजकीय भेटींनंतर झालेल्या घडामोंडीमुळे नवी समीकरणे बघायला मिळाली आहेत. त्यामुळे ही भेट शिष्टाचाराचा भाग म्हणून असली, तरी याचे अर्थ काढले जात आहे.
बिहारमध्ये प्रशांत किशोर तीन साडेतीन वर्षांपासून काम करत होते. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. त्यांनी राजकारणात काम करत राहण्याचा निश्चय केला असला, तरी किशोर यांच्याकडून भविष्यातील राजकीय पर्यायांबद्दल नव्याने विचार सुरू आहे का? अशीही चर्चा आहे.
प्रशांत किशोर यांचे गांधी कुटुंबासोबतचे मित्रत्वाचे संबंध जुने आहेत. रणनीतीकार, राजकीय सल्लागार म्हणून किशोर यांचे काँग्रेससोबत नाते राहिले आहे.