नायलॉन मांजाविक्रीच्या दुकानावर छापा

By Admin | Updated: December 29, 2015 00:06 IST2015-12-29T00:06:08+5:302015-12-29T00:06:41+5:30

जुने नाशिक : परिसरातील भद्रकाली बाजारात अनधिकृतपणे नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या विक्रे त्यावर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आगामी मकर संक्रांतीच्या औचित्यावर होणार्‍या पंतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो पक्ष्यांचा नायलॉन मांजामुळे जीव जातो. त्यामुळे नायलॉन मांजावर शहरात बंदी घालण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री व वापरावर निर्बंध आणले आहे. तरीदेखील भद्रकाली परिसरात कादिर गुलाबखान पठाण (२७, रा.हेलबावडी, दुधबाजार) याने विक्रीसाठी नायलॉन मांजा साठवणूक केल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलसी निरीक्षक विकास शेळके यांनी दुकानावर छापा मारून नायलॉन मांजा जप्त केला.

Print on Nylon Stuff Shop | नायलॉन मांजाविक्रीच्या दुकानावर छापा

Web Title: Print on Nylon Stuff Shop