पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीत पश्चिम बंगाल दौऱ्यावर; तीन प्रकल्पांचे लोकार्पण करणार
By देवेश फडके | Updated: January 31, 2021 21:42 IST2021-01-31T21:38:08+5:302021-01-31T21:42:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीन प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीत पश्चिम बंगाल दौऱ्यावर; तीन प्रकल्पांचे लोकार्पण करणार
कोलकाता :पंतप्रधाननरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीन प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतची माहिती दिली.
पेट्रोलियम मंत्रालय आणि रस्ते वाहतूक विभागाच्या तीन मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी ०७ फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या हल्दिया दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच एका प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यावेळी करतील, असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
PM Modi will visit West Bengal on Feb 7. He will be here to dedicate three projects and lay the foundation stone for one project, at the invitation of GoI's petroleum department & the road transport department: Union Petroleum Minister Dharmendra Pradhan, in Haldia, West Bengal pic.twitter.com/hbnIkRpLcO
— ANI (@ANI) January 31, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या प्रकल्पांचा अंदाजित खर्च ५ हजार कोटी रुपये आहे, असे सांगितले जात आहे. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तीन प्रकल्पांचे लोकार्पण महत्त्वाचे मानले जात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २०० जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवण्यात आले आहे.
"सोनार बांगलासाठी आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे"; राजीव बॅनर्जी
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ दिवसांत दुसऱ्यांना पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पश्चिम बंगालला गेले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला होता.
ममता बॅनर्जी भाषणासाठी उभ्या राहिल्या आणि काही उपस्थितांनी श्रीरामांच्या नावाने घोषणा दिल्या. श्रीरामांच्या नावाने घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाषण देण्यास नकार दिला होता. तर दुसरीकडे अमित शाह हेदेखील कोलकाता दौऱ्यावर जाणार होते. मात्र, इस्रायल दूतावासाजवळ झालेल्या स्फोटानंतर अमित शाह यांनी दौरा रद्द केला.