पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम; जागतिक नेत्यांच्या यादीत सर्वात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 08:37 IST2023-09-17T08:37:19+5:302023-09-17T08:37:37+5:30

यापूर्वी जून २०२३ मध्ये जागतिक नेत्यांची ॲप्रुव्हल रेटिंग यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते

Prime Minister Narendra Modi's magic continues; Topping the list of world leaders | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम; जागतिक नेत्यांच्या यादीत सर्वात अव्वल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम; जागतिक नेत्यांच्या यादीत सर्वात अव्वल

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीतील (ग्लोबल लीडर ॲप्रुव्हल लिस्ट) अव्वल स्थान कायम आहे. त्यांच्या नेतृत्वाला भारतातील ७६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. मोदी यांच्यानंतर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बर्सेट ६४ टक्के पाठिंब्यासह दुसऱ्या व मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तिसऱ्या  क्रमांकावर आहेत. 

टॉप टेन नेते    लोकप्रियता
नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत        ७६%
एलेन बरसेट, राष्ट्रपती, स्वित्झर्लंड    ६४%
आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रोडोर    ६१%
लुईस दा सिल्वा, राष्ट्रपती, ब्राझील    ४९%
अँथनी अल्बानीज, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया    ४८%
जॉर्जिया मेलोनी, पंतप्रधान, इटली    ४२%
जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका    ४०%
पेड्रो सांचेझ, पंतप्रधान, स्पेन     ३९%
लिओ वराडकर, पंतप्रधान, आयर्लंड    ३८%
जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा    ३७%

जूनमध्येही मोदीच होते अव्वल
यापूर्वी जून २०२३ मध्ये जागतिक नेत्यांची ॲप्रुव्हल रेटिंग यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते; परंतु मागील यादीच्या तुलनेत त्यांचे रेटिंग दोन टक्के कमी झाले आहे. गेल्या वेळी त्यांना ७८ टक्के ॲप्रुव्हल रेटिंग मिळाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन सातव्या स्थानावर होते, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे १२व्या स्थानावर होते. आता या दोघांचेही स्थान घसरले आहे. 

कोणत्या माहितीचा घेतला आधार?
डिसिजन इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने १४ सप्टेंबर रोजी ‘ग्लोबल लीडर ॲप्रुव्हल रेटिंग ट्रॅकर’ जारी केला आहे. ६ ते १२ सप्टेंबरदरम्यान गोळा केलेल्या डेटाच्या आधारे हे ॲप्रुव्हल रेटिंग देण्यात आले आहे. यात अनेक देशांतील लोकांशी बोलून त्यांचे जागतिक नेत्यांबद्दलचे मत जाणून घेण्यात आले. या यादीत २२ देशांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यांपैकी बहुतांश जी-२० सदस्य आहेत.

Web Title: Prime Minister Narendra Modi's magic continues; Topping the list of world leaders