शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पंतप्रधान मोदींची जादू कायम : ३ राज्यांत कमळ फुलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 05:40 IST

त्रिपुरात पूर्ण बहुमत; नागालँडमध्ये युती; तर मेघालयात संगमा यांनीच मागितले भाजपकडे सत्तेसाठी समर्थन

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू अद्यापही देशात कायम असून, ईशान्येतील तीन राज्यांत पुन्हा एकदा भाजप व भाजप समर्थित आघाडीची सरकारे स्थापन होत आहेत. त्रिपुरात भाजपला पूर्ण बहुमत, नागालँडमध्ये भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले व मेघालयात कॉनराड संगमांचे एनपीपी सरकार स्थापण्यासाठी भाजपबरोबर जाऊ शकते, असे दिसते. 

मेघालयात एनपीपीचे नेते मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली व सरकार स्थापनेसाठी भाजपचे समर्थन मागितले.

अंदाज खरे ठरले...एक्झिट पोलच्या अंदाजाच्या जवळपासच तिन्ही राज्यांचे निकाल आले. त्रिपुरात भाजपची सत्तेत वापसी हा मोठा विजय आहे. यावेळी काँग्रेस व डाव्या आघाडीशी लढत देताना व तिरपा मोथांच्या आदिवासी जागांवर मते खाण्यामुळे सत्तावापसीचा रस्ता कठीण दिसत होता. भाजपने वेळीच विप्लव देव यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून माणिक साहा यांना त्या पदावर बसविले. त्यांच्या नेतृत्वात भाजपची त्रिपुरात सत्तेत वापसी झाली आहे.

हे आहे यशाचे सूत्र?n नरेंद्र मोदी देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत, जे सर्वांत जास्त ईशान्येकडील राज्यांच्या दौऱ्यावर गेले. तसेच केंद्रीय मंत्र्यांना वारंवार या राज्यांमध्ये पाठवत आले आहेत. लूक नॉर्थ इस्टचे धोरण अवलंबले. चीनच्या आक्रमणाचा फटका सहन करणाऱ्या अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या संख्येने लष्कर तैनात केले. n सीमेवर विकासकामे व सीमावर्ती गावांना व्हायब्रंट व्हिलेज करण्यासाठी तेथे पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे. मोदींना ईशान्येबाबत वाटणारी चिंता व काम जनतेने स्वीकारले.

तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री होणारत्रिपुरा :  विजयानंतर स्वच्छ प्रतिमा असलेले मुख्यमंत्री माणिक साहा यांनाच पुन्हा मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याच नेतृत्वात भाजपने विजय मिळविला. ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत. ते सर्जन आहेत व निवडणुकीच्या काळातही गरजू लोकांची त्यांनी सर्जरी केली. नागालँड :  भाजप व एनडीपीपी युती स्पष्ट बहुमताने सत्तेत परतत आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो हेच पुन्हा नागालँडचे मुख्यमंत्री निवडले जाऊ शकतात. मेघालया :  कॉनराड संगमा यांचा एनपीपी सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. काँग्रेस व तृणमूल काँग्रेसलाही तेथे काही जागा मिळाल्या आहेत. परंतु, पुढील राजकारण पाहता संगमा यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTripuraत्रिपुराNagaland Election Results 2018नागालँड निवडणूक निकाल 2018BJPभाजपा