Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिमाचलच्या लेप्चामध्ये सैनिकांसोबत दिवाळी; देशवासियांना दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 12:28 IST2023-11-12T12:07:04+5:302023-11-12T12:28:28+5:30

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना केली आहे.

prime minister narendra modi wished the countrymen happy diwali | Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिमाचलच्या लेप्चामध्ये सैनिकांसोबत दिवाळी; देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिमाचलच्या लेप्चामध्ये सैनिकांसोबत दिवाळी; देशवासियांना दिल्या शुभेच्छा

देशभरात दिवाळीचा सण मोठा उत्साहात, आनंदात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना केली आहे. मोदींनी ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! हा विशेष सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो" असं म्हटलं आहे. 

हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी आपल्या जवानांसोबत साजरी करत आहेत. 2014 पासून पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळीचा सण आनंदात साजरा करत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर हे नववे वर्ष असून मोदी जवानांच्या आनंदात सहभागी होत आहेत.

दिवाळीनिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईसह सर्व मोठ्या शहरांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिवाळी उत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि प्रतिबंधित फटाके जाळण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.


 

Web Title: prime minister narendra modi wished the countrymen happy diwali