शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 21:35 IST

Parliament Session: आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी यांनी अयोध्येचाही उल्लेख केला. राहुल गांधी बोलत होते तेव्हा, फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसादही त्यांच्या सोबत लोकसभेत बसलेले होते.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सोमवारी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. याच वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी यांनी अयोध्येचाही उल्लेख केला. राहुल गांधी बोलत होते तेव्हा, फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसादही त्यांच्या सोबत लोकसभेत बसलेले होते.

यावेली राहुल गांधी म्हणाले, ''अयोध्या-फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसाद यांनी आपल्याला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून निवडणूक लढवण्यासाठी 2 वेळा सर्व्हे करवला होता. सर्व्हे करणाऱ्यांनी, अयोध्येतून निवडणूक लढू नका, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. अयोध्येतील जनता पराभूत करेल. यामुळे नरेंद्र मोदी वाराणसीला गेले आणि तेथे बचावले.''

अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? राहुल गांधींनी सांगितलं -राहुल गांधी म्हणाले, अवधेश प्रसाद यांनी आपल्याला सांगितले की, त्यांना पहिल्या दिवसापासूनच निवडणूक जिंकण्याचा विश्वास होता. त्यांनी मला सांगितले की, लोकांची जमीन तर घेतली, पण त्यांना नुकसान भरपाई दिली नाही. ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना मंदिराच्या उद्घाटनासाठीही बोलावले नाही.

अयोध्येतील जनतेच्या मनात मोदींनी भय निर्माण केले - अवधेश प्रसाद यानी आपल्याला सांगितले की, छोट्या-छोट्या दुकानदारांचे व्यापार मोडून त्यांना रस्त्यावर आणले. उद्घाटनाला अदानी-अंबानी होते. पण अयोध्येतील कुणीच नव्हते. अयोध्येतील जनतेच्या मनात नरेंद्र मोदी यांनी भीती निर्माण केली. त्यांच्या जमिनी घेतल्या. त्यांची घरे पाडली. मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले नाही, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४