गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:17 IST2025-08-06T17:12:38+5:302025-08-06T17:17:27+5:30

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी हे शांघाई सहकार्य संघटना (एससीओ) च्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.

Prime Minister Narendra Modi to visit China for the first time after Galwan clash, attend SCO summit | गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार

गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला युद्धविरामाबाबतचा दावा आणि अडलेल्या व्यापार करारावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. तसेच त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठ्या प्रमाणात पडसाद उमट आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याचा उद्देश हा द्विपक्षीय संबंधांना मजबूत करण्याचा असेल. तर चीनच्या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी हे शांघाई सहकार्य संघटना (एससीओ) च्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० ऑगस्ट रोजी जपानच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तिथे ते जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत भारत-जपान वार्षिक शिखर संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये दोन्ही देशांमधील रणनीतिक, आर्थिक आमि तांत्रिक सहकार्याला आणखी पुढे नेण्याबाबत चर्चा होईल.

जपान दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनच्या तियानजिन शहरात आयोजित शांघाई सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी होती. सन २०१९ नंतरचा नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच चीन दौरा असेल. एसईओच्या बैठकीमध्ये प्रादेशिक सुरक्षा, दहशतवाद, व्यापारामधील सहकार्य आणि बहुपक्षीय सहकार्य यासारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

एकीकडे रशियाकडून खनिज तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ब्रिक्स देशांवर सातत्याने टीका करत असल्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी याचा हा चीन दौरा होत आहे. ब्रिक्स देश डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा हा दौरा रणनितीकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi to visit China for the first time after Galwan clash, attend SCO summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.