पंतप्रधान मोदी सामान्य माणूस नसून अवतार, मी स्वतः रामसेतू बांधणीच्या खारूताईसारखी : कंगना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:01 IST2025-04-08T12:59:39+5:302025-04-08T13:01:35+5:30
कंगना रणौत यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींना रामाचा अवतार म्हटले होते.

पंतप्रधान मोदी सामान्य माणूस नसून अवतार, मी स्वतः रामसेतू बांधणीच्या खारूताईसारखी : कंगना
मंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य मानव नसून अवतार आहेत. २०१४ पर्यंत मी मतदानालाही गेली नव्हते. नेत्यांबद्दल द्वेष होता, पण आता लोक चांगले काम सोडून राजकारणात आले आहेत. कारण आता नरेंद्र मोदींच्या रूपाने एक चांगला नेता आपल्याकडे आहे. या आधी सगळे खात होते आणि देशाची नासधूस करत होते, असे वक्तव्य मंडी, हिमाचल येथील भाजप खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी केले आहे.
कंगना रणौत यांनी सोमवारी मंडीतील जोगिंदर नगर येथील लडभडोल येथे आयोजित जाहीर सभेत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी हिमाचल सरकारवरही जोरदार हल्ला चढवला.
कंगना रणौत यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींना रामाचा अवतार म्हटले होते. जानेवारी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगना यांनी म्हटले होते की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये रामचंद्र भगवानचा अंश दिसत आहे. मी त्यांच्या सैन्यात आहे. मी स्वतः रामसेतू बांधणीदरम्यानच्या खारूताईसारखी आहे, जी या पक्षाला हातभार लावत आहे. लोकसभेत बसून मतदान करताना हिमाचलच्या लोकांची आठवण येते, असे त्या म्हणाल्या. जनतेने एका सामान्य मुलीला संसदेत पाठवले याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.