शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

दांडीबहाद्दर मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली सक्त ताकीद; हजर राहा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:11 IST

खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही खासदारांनी काम करावं.

ठळक मुद्देभाजपाची संसदीय दलाची बैठक आज पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं खासदारांना मार्गदर्शन गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीच्या संसदीय दलाची बैठक मंगळवारी संसदेच्या लायब्रेरी बिल्डींगमध्ये पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना समाजसेवा करण्याचा सल्ला दिला तसेच मंत्र्यांना सक्त ताकीद दिल्याचं पाहायला मिळालं.

मंत्रालयाच्या कार्यालयात मंत्री उपस्थित राहत नाही त्यावरुन विरोधी पक्षाची तक्रार आहे. जे मंत्री कार्यालयीन वेळेत मंत्रालयात गैरहजर राहतात अशा मंत्र्यांची नावे मागविली असून त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे अशी सक्त ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिली. 

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही खासदारांनी काम करावं. दुर्गम भागातील पसरणाऱ्या आजारावर खासदाराने काम करणं गरजेचे आहे असं पंतप्रधानांनी सांगितले. 

दरम्यान मंत्री कार्यालयात उपस्थित राहत नाही यावरुन पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त करत जे मंत्री कार्यालयात नेहमी गैरहजर राहतील अशा मंत्र्यांची नावे मला द्यावीत. मला सगळ्यांना बरोबर करता येते. राज्यसभा आणि लोकसभेत मंत्र्यांना दोन-दोन तास ड्युटी असते तरीही अनेकदा मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत. त्याबद्दल विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दांडी मारणाऱ्या मंत्र्यांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच खासदारांनीही अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणं सक्तीचं आहे असं त्यांनी सांगितले.  

 

मागील संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी खासदारांना सुनावले होते. चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात राम, सीता, लक्ष्मण हे काही काळ पंचवटीत राहिले होते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या सर्व खासदारांनी नियमित हजेरी लावली पाहिजे. त्यांनी जनकल्याणासाठी झटले पाहिजे. त्याकरिता ते ओळखले गेले पाहिजेत. अरेरावी व गैरवर्तनाच्या घटनांमुळे भाजपचे नाव खराब होते. एखाद्याकडून चूक घडली तर त्याने माफी मागण्याची तयारीही दर्शविली पाहिजे.

लोकसभेमध्ये तिहेरी तलाकविरोधी नवे विधेयक मांडण्यात आले त्यावेळी सभागृहात कमी संख्येने भाजप खासदार हजर होते. त्याविषयीही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली होती.  तसेच भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान पाच झाडे लावावीत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला होता. या वृक्षलागवड कार्यक्रमाला त्यांनी पंचवटी असे नाव दिले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाministerमंत्रीMember of parliamentखासदार