मूर्खों के सरदार, तू कोणत्या जगात राहतोस?; राहुल गांधींवर नरेंद्र मोदींचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 07:16 IST2023-11-15T07:16:07+5:302023-11-15T07:16:25+5:30

बैतूल येथील प्रचारसभेत बैतूल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचा नामोल्लेख टाळत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. 

Prime Minister Narendra Modi has criticized Congress leader Rahul Gandhi. | मूर्खों के सरदार, तू कोणत्या जगात राहतोस?; राहुल गांधींवर नरेंद्र मोदींचा प्रहार

मूर्खों के सरदार, तू कोणत्या जगात राहतोस?; राहुल गांधींवर नरेंद्र मोदींचा प्रहार

बैतूल- येथील प्रचारसभेत बैतूल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचा नामोल्लेख टाळत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. राहुल गांधींच्या 'मेड इन चाइना फोन'च्या वक्तव्याचा समाचार घेताना मोदी म्हणाले, 'काल काँग्रेसच्या एका महाज्ञानीनी टीका केली. भारतातील बहुसंख्य लोक मेड इन चायना मोबाइल वापरतात, असे ते म्हणाले.

अरे मुर्खाच्या सरदार, तू कोणत्या जगात राहतोस? भारताच्या उपलब्धींकडे दुर्लक्ष करण्याच्या मानसिक आजाराने काँग्रेस नेत्यांना ग्रासले आहे. भारत आता मोबाइल उत्पादन करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश बनला आहे. काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता, तेव्हा भारतात केवळ २०,००० कोटी रुपयांचे मोबाइल उत्पादन होत होते. आज, भारतातील मोबाइल उद्योग २.५ लाख कोटींवर गेला आहे, असेही ते म्हणाले.

 

Web Title: Prime Minister Narendra Modi has criticized Congress leader Rahul Gandhi.