शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

आई सोबत का राहत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं हे उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 17:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आई त्यांच्या सोबत का राहत नाही, या अनेकांना पडलेल्या प्रश्नाचेही उत्तर नरेंद्र मोदी यांनी दिले. दिल्लीतील पंतप्रधान आवासमधील या एवढ्या मोठ्या घरात तुम्ही राहता. मग तुमची आई-भाऊ सोबत राहावेत, असे तुम्हाला वाटत नाही का, अशी विचारणा केली असता मोदी म्हणाले की, ''जर मी पंतप्रधान बनून घरातून बाहेर पडलो असतो तर कुटुंबीयांना सोबत आणावे असे, वाटले असते. मात्र मी खूप लहान वयात घर सोडले. त्यानंतर जीवनात बदल झाला. तसेच माझे प्रशिक्षणही त्याच पद्धतीने झाले आहे. ज्यावेळी घर सोडले तेव्हा खूप त्रास झाला होता. मात्र आता सवय झावी आहे. मनाला वाटलं तेव्हा आईला बोलावून घेतले. तिच्यासोबत काही दिवस व्यतित केले. आता जेव्हा जेव्हा मी आईला भेटतो तेव्हा ती सव्वा रुपया माझ्या हातावर ठेवते. मग सांगते की माझ्यामागे वेळ वाया का घालवत आहेस. मी इथे राहून काय करू. गावात लोक येत जात असतात. गप्पागोष्टी होतात. तसेच मी सुद्धा तीला फार वेळ देऊ शकत नाही.''  यावेळी नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. आमच्या घरात इस्त्री नव्हतीच म्हणूनच मग कपड्यांना प्रेस करण्यासाठी तांब्यामध्ये कोळसा टाकायचो. ते कपडे परिधान करून मगच बाहेर जात होतो. यावेळी मोदींच्या निद्रेसंदर्भातही अक्षयनं प्रश्न विचारला. तुम्ही 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच. त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण ते माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले, की माझं ऐकलं की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. अक्षयनं मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मी त्याला सलाम करतो. इतकंच नव्हे 1962च्या युद्ध छेडलं गेलं होतं.तेव्हा देशासाठी प्राण देण्याचं मनोमन ठरवून टाकलं होतं. तेव्हाच मी वाचलं की गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे. तेव्हा वडिलांना मी सांगितलं की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक